Kwid Car 
पुणे

रेनो इंडियाने केली आतापर्यंत तब्बल एवढ्या ‘क्विड’ गाड्यांची विक्री

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या प्रवासाच्या दृष्टीने कार हा सुरक्षित वाहतूक पर्याय ठरत आहे. त्या अनुषंगाने रेनो इंडियाच्या वतीने त्यांचे प्रमुख उत्पादन ‘क्विड’ ग्राहकांकरिता अधिक सुलभतेने उपलब्ध करून दिले आहे. भारतात ‘क्विड’ने ३.५ लाखांचा विक्रीचा टप्पा पार केल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेनोच्या वतीने ग्राहकांकरिता ‘बाय नाऊ पे लेटर’ योजना उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून ग्राहकांना रेनो कार विकत घेता येणार असून, खरेदीच्या तीन महिन्यांनंतर ईएमआय भरता येतील. या उत्पादन श्रेणीवर कॅश ऑफर, हस्तांतरण लाभ आणि वित्तीय साह्य ८.२५ टक्‍क्‍यांच्यावर उपलब्ध राहणार आहे. नवीन आरएक्‍सएल वेरीयंटचा शुभारंभ बीएस ६, सुसज्जित १.० एल पॉवरट्रेनने युक्त असून एमटी आणि एएमटी आवृत्तीसह अनावरण करण्यात आले आहे. क्विड एएमटी १.० एलमध्येही सहजरीत्या उपलब्ध असून, बीएस ६ टू पेडल पर्याय बाजारात दाखल होणार आहे. 

‘क्विड’कडे बळकट ग्राहक पार्श्वभूमी असल्याने ते यशस्वी उत्पादन ठरत आहे. त्यामुळेच ग्राहकवर्गाकडून याला खंबीर समर्थन लाभले आहे. ‘क्विड’चे अद्वितीय उत्पादन हे डिझाईन, कल्पकता आणि आधुनिकतेने-युक्त असल्याचे रेनो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममील्लापल्ले यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! तरुणावर ८ जणांचा गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी; घटनेनं खळबळ

IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंवर शाईफेक

भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

SCROLL FOR NEXT