Money 
पुणे

नदीपात्रातील दुकानांची पुढाऱ्यांकडून भाडेवसुली

सकाळवृत्तसेवा

पुणे - नदीपात्रालगत दंडेलशाही करीत बेकायदा थाटलेल्या दुकानांना भरमसाट भाडे असल्याचे उघडकीस आले आहे. अतिक्रमण केलेली जागा आपल्याच मालकीची भासवून राजकीय नेते महिन्याकाठी भाडे वसूल करीत आहेत. या ‘उद्योगात’ महापालिकेतील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा हात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमध्येही संबंधितांकडे भाडेवसुलीचा तगादा लावल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अशा अतिक्रमणांमुळे मुळा-मुठेचे पात्र आक्रसून पुराचे संकट ओढावले असल्याचे निरीक्षक राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे (एनजीटी) आहे. अतिक्रमणे काढून नद्यांचा प्रवाह सुरक्षित करण्याची तंबी देऊनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. 

नदीपात्रात म्हात्रे पूल ते राजाराम पुलापर्यंतच्या डीपी रस्त्यालगत दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे झाली आहेत. त्यातील एका बाजूला भराव टाकून मंगल कार्यालये, लॉन, गॅरेज, हॉटेल थाटण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे जमीनदोस्त करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिका, पाटबंधारे खात्याला दिला आहे. तो देऊन तीन वर्षे झाली तरी त्यावर पाहणीपलीकडे कसलीच कारवाई केली जात नाही.

नदीपात्रालगतची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही. ती काढताना कोणी आणि का केली, याचीही चौकशी करून कारवाई करू. 
- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

SCROLL FOR NEXT