pay commission sakal
पुणे

पुणे महापालिकेच्या वसाहतींना सहाव्या वेतन आयोगानुसार भाडे

पुणे महापालिकेच्या शहराच्या विविध भागात ८ वसाहती बांधल्या असून, त्या किमान ४० ते ५० वर्ष जुन्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेच्या शहराच्या विविध भागात ८ वसाहती बांधल्या असून, त्या किमान ४० ते ५० वर्ष जुन्या आहेत.

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची (Employee Colony) दुरवस्था झाली आहे. गळतीचा प्रश्‍न मोठा आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे (Administrative) लक्ष नाही, पण सातव्या वेतन आयोगानुसार घराचे भाडे (Home Rent) थेट सहा सात हजारांवरून १५ हजाराच्या पुढे गेले आहे. ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी भाडेवाढ रद्द करून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच (Sixth Pay Commission) भाडे घेतले जावे या प्रस्तावास आज (ता. १७) मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे

महापालिकेच्या शहराच्या विविध भागात ८ वसाहती बांधल्या असून, त्या किमान ४० ते ५० वर्ष जुन्या आहेत. वसाहती जुन्या झाल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. खिडक्या, दारे तकलादू झाली आहेत. स्वयंपाक घर, स्नानगृहातून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरील पाणी पहिल्या मजल्यावरील घरात टपकत आहे.

महापालिकेच्या चाळ विभागाने या इमारतींची पाहणी करून या इमारती धोकादायक झाल्या असल्याचा अहवाल दिला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता २०१३-१४ च्या आॅडिट रिपोर्टनुसार सेवकांच्या घरभाड्यात वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगामुळे ही भाडेवाढ मोठी झालेली आहे. ही वाढ रद्द करावी यासाठी माजी सभागृहनेते धीरज घाटे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. हा विषय आज मुख्यसभेत आल्यानंतर त्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.

भाडे वाढल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. बाहेर १३-१४ हजारात चांगला फ्लॅट भाड्याने मिळतो, पण एवढेच भाडे देऊन कर्मचारी गळक्या घरात राहत आहेत. त्यामुळे सहाव्या वेतन आयोगानुसार भाडे घ्यावे व त्यास त्वरित प्रशासकीय मान्यता द्यावी, असे अशी भूमिका घाटे यांनी सभागृहात मांडली. यास सर्वपक्षांनी पाठिंबा देऊन भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT