Students 
पुणे

विद्यार्थ्यांनो, परीक्षेबाबत तक्रार नोंदवा ४८ तासात; पुणे विद्यापीठाकडून नियमावली जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १० एप्रिलपासून घेतल्या जाणाऱ्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विषयात मिळालेले गुण हे  ४८ तासाच्या आत ‘स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम’मध्ये दिले जातील. त्यानंतर पुढील ४८ तासात विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंका आणि तक्रारी त्याच ठिकाणी नोंदवता येतील. स्टुडंट प्रोफाइल सिस्टीममध्ये नोंदविलेल्या तक्रारींची शिवाय अन्य कोणत्याही तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेचा सराव करता यावा, यासाठी विद्यापीठाच्या वतीने येत्या ५ ते ९ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मॉक टेस्ट घेतली जाणार आहे.  तसेच ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक अडचणीने खंड पडल्यास तेवढाच वेळ संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीत वाढून दिला जाईल. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेसंदर्भातील माहिती एसएमएस आणि ई-मेलद्वारे दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्याचा नोंदणीकृत ई-मेल आयडी तसेच मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे गरजेचे आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णय नुसार परीक्षेसाठी २० मिनिटांचा कालावधी अधिक दिला जाईल. विद्यापीठाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार अभियांत्रिकी २०१५ पॅटर्नच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील अनुशेष (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर असणार आहेत. गणित आणि संख्याशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन प्रॉक्टर पद्धतीने बहुपर्यायी पद्धतीने ५० गुणांकरिता ३० प्रश्न प्रत्येक २ गुणांसाठी या पद्धतीने विचारण्यात येतील. विद्यार्थ्यांनी दिलेली २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन परीक्षा पूर्ण केल्याची पोहोच दिसेल. त्याचा स्क्रीन शॉट, फोटो, प्रिंट जतन करून ठेवावेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केवळ sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा. याच संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भातील आवश्यक माहिती असेल. तसेच परीक्षेदरम्यान काही अडचण आल्यास ०२०- ७१५३०२०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे.  

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT