plasma-therapy 
पुणे

कोरोनाच्या लढाईत दौंडसाठी हा अहवाल ठरलाय...

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरातील गोवा गल्ली येथील ७० वर्षीय नागरिकास कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील १४ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सुदैवाने सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तालुक्यात २१ दिवसांत ४७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती व त्यापैकी २५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

याबाबत दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. संग्राम डांगे यांनी आज (ता. २२) माहिती दिली की, गोवा गल्ली येथी ७० वर्षीय नागरिकास २० मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. उप जिल्हा रूग्णालयाच्या वतीने शहरातील कोविड केअर सेंटर येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या १४ नागरिकांचे घशातील द्रव काल चाचणीसाठी पुणे येथे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज आला असून, सर्व १४ जण निगेटिव्ह आले आहेत. गोवा गल्ली येथे सापडलेल्या कोरोना बाधितामुळे शहरात भीती वाढली होती. परंतु, 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि :श्वास सोडला आहे.

दौंड शहरात १८ पोलिस व ४ नागरिक, अशा एकूण २२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यापैकी १८ पोलिसांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. ४ नागरिकांपैकी २ जणांवर पुणे येथे, तर २ जणांवर दौंड शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्यातील २५ जणांनी केली मात 
दौंड तालुक्यात २९ एप्रिल रोजी पहिल्यांदा दहिटणे येथील सत्तर वर्षीय नागरिकास कोरोनाची बाधा झाली होती. सदर ज्येष्ठ नागरिकाने कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत दहिटणे येथील १ सत्तर वर्षीय नागरिक, एसआरपीएफ गट क्रमांक सातचे २७ अधिकारी व कर्मचारी, दूध विक्रेत्यासह कुटुंबातील एकूण ३ जण, गोवा गल्ली येथील ७० वर्षीय नागरिक, आयआरबीचे १५ पोलिस, असे एकूण ४७ जणांना बाधा झाली आहे. त्यापैकी दहिटणे येथील १ नागरिक व एसआरपीएफचे २४ पोलिस, अशा २५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील बाधितांची आजअखेर संख्या २२ आहे.      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT