Atul-Benake 
पुणे

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आमदारांचा रिपोर्ट आला कोरोना पॉझीटिव्ह

रवींद्र पाटे

नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल बेनके यांना कोरोना चा संसर्ग झाला असल्याने त्यांना आज रात्री चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांचे बंधू अमित बेनके यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नारायणगाव येथील व्यापाऱ्याच्या मुलाचा १३ ऑगस्ट रोजी ओसरा हॉटेल येथे विवाह झाला. नियमबाह्य धुमधडाक्यात झालेला हा विवाह वादग्रस्त ठरला आहे. या विवाहाला तालुक्याचे आजी व माजी आमदार यांच्यासह सुमारे तीनशे नागरिक उपस्थित होते. कोरोना बाधीत असलेली वधूची आजी या विवाहाला उपस्थित होती. या मुळे वधु, वर, वरपिता यांच्यासह २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या प्रकरणी हॉटेल मालक, कार्यमालक यांच्यावर गुन्हा झाला आहे. कोरोनाच्या वाढत असलेल्या संसर्गामुळे विवाहाला उपस्थित असलेले आजी, माजी आमदार व व्यापारी यांचे धाबे दणाणले होते.

आमदार बेनके यांचा कोरोना अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याने हा विवाह आमदार बेनके यांना सुद्धा अडचणीचा ठरला असल्याचे मत व्यक्त होत आहे. आमदार बेनके यांना अंगदुखी, खोकला आदि लक्षणे दिसून आल्याने २७ ऑगस्ट रोजी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. आज रात्री त्यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आला. मागील चार महिन्यापासून आमदार बेनके सातत्याने लोक संपर्कात आहेत. जुन्नर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने रूग्णांना तालुक्यात लेण्याद्री, ओझर व नारायणगाव येथिल कोविड केंद्रात उपचार मिळावे या साठी ते सातत्याने प्रयत्न शील होते.त्यांच्या प्रयत्नामुळे नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना रूग्णांसाठी वीस ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध झाली आहे. २६ ऑगस्ट रोजी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नारायणगाव येथे झालेल्या कोरोना उपचार आढावा बैठकीस आमदार बेनके उपस्थित होते.

त्या नंतर सायंकाळी त्यांनी अदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे भेट देऊन जमीन व घरांना पडलेल्या भेगांची पाहणी केली. त्यानंतर पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीसाठी ते गेले होते. या बाबत त्यांचे बंधू डॉ.अमोल बेनके म्हणाले आमदार बेनके यांना ताप असून अंगदुखीचा त्रास होत आहे. आज रात्री पासूनच त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT