immunity power 
पुणे

गूड न्यूज : पुणेकरांच्या रोगप्रतिकार शक्तीवर होणार संशोधन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकीकडे कोरोनाच्या चाचण्यांमधून नव्या रुग्णांचे निदान होत असताना दुसरीकडे पुणेकरांच्या रोगप्रतिकारशक्तीवरही संशोधन केले जाणार आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध संशोधन संस्था, खासगी उद्योग, शास्त्रज्ज्ञ "नॉलेज क्लफस्टर'च्या माध्यमातून काम काम करत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने देशात पुण्यासह बेंगलोर, हैद्राबाद आणि दिल्ली या चार शहरांना "नॉलेज क्लडस्टर'ची मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुणे विद्यीपीठासह भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आयुका, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, लष्करी संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्यासह काही खासगी कंपन्या एकत्र काम करत आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

महापालिकेने कोरोना विषाणू संसर्गातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती अभ्यासासाठी दिली आहे.त्याचे विश्लेणषण करण्यात येत आहे. करोनाचा प्रसार समजून घेण्यासाठी रोगप्रतिकार शक्तीचा अभ्यास केला जात आहे. या "इम्युनॉलॉजी सर्व्हे' मध्ये ज्यांची कोरोना बाधीत म्हणून नोंद झालेली नाही अशा शहरातील विविध भागांमधील नागरिकांचे रॅंडम पद्धतीने रक्त नमूने घेतले जात आहेत. त्यातून नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाले आहेत का? हे तपासले जाईल. अँटीबॉडीज आढळल्यास त्यांना कोरोनाची लागन झाली होती हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे संसर्गाचा प्रसार कशा पद्धतीने, कोणत्या भागांमध्ये झाला हे समजून घेता येईल. तसेच करऱ्यातून संसर्ग होतो का यावरही अभ्यास केला जाणार आहे, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

नॉलेज क्लास्टरच्या सूचनेनुसार नियोजन
पुण्यात कोरोनाला नियंत्रीत करण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. पण त्याचसह महापालिकेडून कोरोना संदर्भातील माहिती, आकडेवारी "नॉलेज क्लतस्टर'साठी उपलब्ध करून दिली आहे. या टीममधील शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञ त्याचे विश्लेहषन करून करोनाचा शहरातील प्रसार कसा वाढत आहे, कोणत्या भागात कमी होतोय, तर कोणत्या भागात कमी आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरूप कसे असावे, त्यासाठीचे निकष कोणते असतील, अंमलबजावणी कशी करावी याबाबत पुणे महापालिकेला आराखडा तयार करून दिला जात आहे. यानुसार महापालिका नियोजन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

Madhya Pradesh: वर्षभरात ८५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी; ६२ खनिज निरीक्षकांना नियुक्तीपत्रे

'हे काय चाललंय आयुष्यात...' जितेंद्र जोशींनी नम्रता शिरोडकरबरोबरच्या कामाचा सांगितला अनुभव, म्हणाले, 'एक वेगळच दडपण...'

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

IND vs SL Semi Final : झाला हो गाजावाजा,पण...! भारताची आघाडीची फळी ढेपाळली; वैभव सूर्यवंशी ठिक खेळला, संजू-अभिषेक फेल

SCROLL FOR NEXT