पुणे

कोरोना काळातच खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर झाले नाराज, कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत, महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्डात ड्युटी बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांना स्टायपेंड वाढ करण्यात आलेली नसल्याने ते नाराज झाले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावात खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमएस, एमडी अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, संलग्न रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. मात्र, राज्य सरकारने केवळ सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे स्टायपेंड वाढविले असून, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांकडे दुर्लक्ष केले आहे.  त्यामुळे या डॉक्टरांमध्ये असंतोष आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने स्टायपेंडवाढीचा निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड वाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने या निवासी डॉक्टरांना मे महिन्यापासून १० हजार रुपये वाढीव वेतन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, या निर्णयात खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना वगळण्यात आले असून, त्यांचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय झाला आहे.

राज्य सरकारने सरकारी आणि खासगी डॉक्टर यांच्यामध्ये स्टायपेंड वाढीतून भेदभाव करण्याचा प्रकार केल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. राज्यातील निवासी डॉक्टर हे आपला जीव धोक्यात घालून कोरोना वॉर्डात संसर्गाची सामना करीत आहेत; तसेच संशयित रुग्णांची सेवा करीत आहे. कोरोनाची रुग्णसंसख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी ही रुग्णसेवा २४ बाय ७ होत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची परवा न करता रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमइआर) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टराचे स्टायपेंड १० हजारांनी वाढवण्याची मागणी निवासी डॉक्टरांनी केली आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT