अप्पर पोलीस पोलीस अधीक्षकांची उपस्थिती sakal
पुणे

हवेली पोलीस ठाण्याच्या तक्रार निवारण दिनाला प्रतिसाद ; 35 अर्जांची निर्गती

अप्पर पोलीस पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

निलेश बोरुडे

किरकटवाडी: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रार अर्जांची निर्गती व्हावी, परस्पर समन्वयाने नागरिकांमधील वाद मिटावेत व नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून हवेली पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. तब्बल 35 तक्रारींची एकाच दिवशी निर्गती करण्यात आली. पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे नागरिकांच्या तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. नांदेड सिटी आवारातील प्रशिक्षण हॉलमध्ये पुणे ग्रामीण पोलीसांच्या हवेली पोलीस ठाण्याच्या वतीने हा तक्रार निवारणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले तक्रार अर्ज व किरकोळ तक्रारींबाबत तक्रारदार व विरोधी नागरिक यांना समोरासमोर बसवून समजूत घालण्यात आली व कायदा न मोडण्याबाबत सांगण्यात आले. प्रत्येक बीट अंमलदाराने ही प्रक्रिया पार पाडली. यावेळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे व हवेली पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

" मोठे अधिकारी येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले म्हणून आले होते. आमच्या जागेवर दुसऱ्याकडून हक्क सांगितला जात आहे.आमच्याकडे सर्व कागद आहेत ते साहेबांना दाखवणार आहे."

अंजना नामदेव खिरिड, गोऱ्हे बुद्रुक.

"किरकोळ स्वरूपाचे वाद परस्पर संवादाने मिटावेत व पोलीस ठाण्यातील प्रलंबित तक्रारींबाबत वेगाने कारवाई व्हावी आणि नागरिकांना आपल्याच हद्दीत आपली बाजू मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पोलीसांशी संबंधीत नसलेल्या तक्रारीही आहेत त्याबाबत योग्य ठिकाणी दाद मागण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे."

मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT