Doctor
Doctor Sakal
पुणे

कोरोना होऊन गेल्यावरही घ्या विश्रांती!

- मीनाक्षी गुरव

पुणे - कोरोनातून (Corona) बरे होऊन तुम्ही लगेचच नियमित कामकाजाला (Work) लागला आहात का?, नियमित धावपळ पण सुरू झालीयं का?, अहो, मग जरा थांबा आणि हे नक्की वाचा. कोरोना विषाणूचा परिणाम (Effect) थेट फुफ्फुसावर (Lungs) होतो. त्यामुळे कोरोनातून तुम्ही बरे झाल्यानंतरही, तुम्हाला खूप लवकर धाप लागल्यासारखे होणे, दम लागणे असा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे लगेचच नियमित धावपळ करू नका, काहीसा आराम करा, थोडी विश्रांती (Rest) घ्या, असा सल्ला डॉक्टर (Doctor) देत आहेत. (Rest even after passing Corona)

आतापर्यंत देशभरात लाखो नागरिकांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. योग्यवेळी निदान, वेळीच औषधोपचार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, या बळावर हा विजय नागरिकांनी मिळविला आहे. परंतु, हे एवढ्यावरच थांबत नाही बरं का ! कोरोना विरुद्धच्या युद्धात त्यातून बरे झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आयुष्य जगण्याची खरी लढाई सुरू होते. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तर अधिक काळजी घ्यायला हवी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याबाबत पुल्मोकेअर रिसर्च ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक आणि छाती रोग तज्ज्ञ डॉ. संदीप साळवी आणि आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांच्याशी संवाद साधला आहे.

कोरोना होऊन गेल्यावर काय काळजी घ्यावी?

डॉ. साळवी : कोरोना होऊन गेल्यावर खूप अशक्तपणा येतो. त्यामुळे हा अशक्तपणा लवकरात लवकर दूर करण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथिने, व्हिटॅमिन्स युक्त आहार महत्त्वाचा आहे. त्याशिवाय नियमित व्यायाम हवा.

कोरोनातून बरे झाल्यानंतर आहार कसा असावा?

डॉ. प्रणिता : कोरोनातून बरे झाल्यानंतर नियमित आयुष्य सुरू होईपर्यंत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवायला हवी. त्यासाठी प्रथिने, व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश असावा. मोड आलेल्या कडधान्यांबरोबरच दूध, पनीर, दही, अंडी, मासे, चिकन, मटण हे खावे. जेवणामध्ये फळभाज्या, पालेभाज्या असाव्यात. दररोज वेगवेगळी फळे खावीत. अगदी घरगुती पद्धतीने पिळून केलेला फळांचा रसही प्यावा.

या काळात काय खाणे टाळावे?

कोरोनातून बरे झाल्यावर शक्यतो तेलकट पदार्थ खाऊ नयेत. पॅकिंग केलेले (पॅक फूड) कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. रेडिमेड ज्यूस घेऊ नये. प्रीझर्व्हवेटिव फूड खाणे टाळायलाच हवे.

कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा?

नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. योगासने करणे उत्तम. नियमित किमान ४५ मिनिटे चालायला हवे. (आपल्या प्रकृतीनुसार कमी-अधिक करता येऊ शकेल) शरीरातील सर्व अवयव ताणले जातील, असे व्यायाम प्रकार करावेत. त्याने शारीरिक आरोग्य चांगले राहील.

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे?

या काळात मनावर खूप दडपण आलेले असते, त्यामुळे अधिक थकवा जाणवतो. त्यामुळे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यावर विशेष भर द्यायला हवा. मेडिटेशन आवश्यक आहे. तसेच पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे. सतत सक्रिय राहिल्यास मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. हा ताण कमी करण्यासाठी लोकांशी बोलत रहा. मन शांत होण्यासाठी आवडत्या गोष्टीत मन गुंतवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT