Restart gym in Pune demand by Pune Fitness Club to the District Collector 
पुणे

....म्हणून पुण्यात पुन्हा जीम सुरु करण्याची होतीये मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. दरम्यान सध्या या लॉकडाऊनला काही प्रमाणात शिथिल करण्यात येत असून जिम व्यवसायकांना प्रशासनाकडून अजून परवानगी मिळाली नाही. तर लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसल्याने पुणे फिटनेस क्लब असोसिएशनच्या वतीने व्यायामशाळा (जिम) पुन्हा उघडण्याची परवानगीसाठी नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश काळे, उपाध्यक्ष रुपेश चव्हाण,  असोसिएशनचे सदस्य राहुल कदम, कल्याणी जादा, कौस्तुब शेडगे आदी उपस्थित
होते.

Video : केरळच्या `त्या` हत्तीणीला पुण्याच्या `या` हरिणीचा वाटत असेल हेवा....

पुण्यात सुमारे अडीच हजार व्यायामशाळा आहेत. यातील मोठ्यापासून लहान सर्व प्रकारच्या व्यायामशाळांचा समावेश आहे. तर यातील सुमारे 90 टक्के व्यायामशाळा या भाड्याच्या जागेत उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिमचालकांना दर महिन्याला भली मोठी रक्कम भाडे स्वरूपात द्यावी लागते. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत व्यायामशाळा जरी बंद ठेवण्यात आल्या तरी देखील त्यांचे भाडे सुरूच होते. याव्यतिरिक्त जिम व्यवसायकांना लाईट बिल, मेंटेनन्स, ट्रेनर पासून ते सफाई कर्मचाऱ्यांचे पगार, तसेच ईएमआय सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा असे या पत्रात सांगण्यात आले आहे. अशी माहिती काळे यांनी दिली.

पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...  

त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा भाग म्हणून व्यायामशाळेत विविध उपाययोजना देखील केल्या जातील असे काळे यांनी सांगितले.

पुणेकरांनो सावधान; पाऊस येतोय

व्यायामशाळेत अशी घेण्यात येईल काळजी
- बीपी, ब्लड शुगर, दमा किंवा आरोग्याच्या इतर कोणत्याही गंभीर समस्या असल्यास जिममध्ये प्रवेश बंद
- प्रत्येक बॅच नंतर व्यायामशाळेतील उपकरणांचे सॅनिटायझर स्प्रेद्वारे निर्जंतुकीकरण 
- सोशल डिस्टनसिंग अनिवार्य
- वैयक्तिक प्रशिक्षणही सोशल डिस्टनसिंगचे पालन करून केले जाईल
- जिममध्ये पिण्याचे पाणी, 'स्टीम बाथ', शॉवर आणि स्पा याला परवानगी नसेल
- चेंजिंग रूमचा वापर बंद ठेवण्यात येईल
सभासदांना बदलत्या खोल्या वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- व्यायामशाळेच्या एकूण जागेनुसार सदस्यांना वेळा ठरवून देण्यात येतील
- व्यायामशाळेत मास्क घालणे गरजेचे


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT