lockdown
lockdown 
पुणे

पुणे तिसऱ्या टप्यात; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

कार्तिक पुजारी

कोरोना बाधितांची संख्या आणि आॅक्सिजन बेड वापराचे प्रमाण थोडेसे जास्त असल्याने पुणे शहराचा समावेश दुसऱ्याऐवजी तिसऱ्या टप्‍प्यात झाला.

पुणे- कोरोना बाधितांची संख्या आणि आॅक्सिजन बेड वापराचे प्रमाण थोडेसे जास्त असल्याने पुणे शहराचा समावेश दुसऱ्याऐवजी तिसऱ्या टप्‍प्यात झाला. यामध्ये विकेंड लॉकडाउन कायम असला तरी सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुकाने खुली राहण्याची वेळ सकाळी सात ते दुपारी चार अशी केली आहे. खासगी कार्यालये, हॉटेल, पीएमपी बससेवा ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. शहरात सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू होईल. हे नियम सोमवारपासून (ता. ७) लागू होणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी हे आदेश काढले. पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटलाही हे आदेश लागू राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापालिकेने १ जूनपासून शहरातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केले. त्यामुळे बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू झाली. महापालिकेच्या निर्बंधांपेक्षा सरकारचे नवे नियम व्यापाऱ्यांसह नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. दुकानांची वेळ व संचारबंदीची वेळ यात दोन तास वाढविले आहेत. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांसह सलून, स्पा आणि ब्युटीपार्लर ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. खेळाची मैदाने, उद्याने उघडण्यास परवानगी दिली आहे. बॅंका, वित्तीय संस्थांचे काम आठवडाभर नियमित वेळेत सुरू असणार आहे, असे विक्रम कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे.

पीएमपी सुरू, मॉल नाट्यगृहे बंद

लॉकडाउनमुळे पीएमपीपुढे आर्थिक संकट निर्माण झालेले असताना नव्या आदेशानुसार बससेवा ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृह, मॉल, नाट्यगृहांत संसर्गाचा धोका जास्त असल्याने ते बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा, महाविद्यालये ३० जूनपर्यंत बंद

शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असून, १४ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. पुण्यातील साथ आटोक्यात येत असली तरी महापालिका आयुक्तांनी ३० जूनपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद असतील, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे आॅनलाइन शिक्षण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

असे आहेत पुण्यासाठी नवे नियम

- अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने आठवडाभर सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत सुरू

- अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार

- मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवारी दुपारी चारपर्यंत खुली

- शहरात रोज सायंकाळी पाच वाजता संचारबंदी लागू होणार

- हॉटेल, रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू

- शनिवार- रविवारी हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू

- लोकल सेवा अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी

- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, उद्याने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत खुली

- खासगी कार्यालये सोमवार ते शनिवार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू

- आउटडोअर क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९

- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार ५० टक्के उपस्थितीस मान्यता

- लग्न समारंभांना ५० जणांना परवानगी

- अंत्यविधी २० जणांच्या उपस्थितीत

- शासकीय बैठका, सहकार बैठका, स्थायी समितीसाठी ५० टक्के उपस्थितीची मान्यता

- राहण्याची सोय आहे अशा बांधकाम प्रकल्पावर दुपारी ४ पर्यंत कामाची मुभा

- शेतीविषयक कामे आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत करता येणार

- जिम, सलून, ब्युटी पार्लर ५० टक्के क्षमतेने सुरू; एसी बंद ठेवावा लागणार

- सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने केवळ बसून

- ई-कॉमर्स व माल वाहतूक नियमित वेळेत सुरू राहील

- आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज नाही. मात्र, पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यात प्रवासासाठी ई-पास अनिवार्य

- अत्यावश्‍यक वस्तू उत्पादन कंपन्या, आयटी, डेटा सेंटर नियमित वेळेत सुरू राहातील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT