Retail price Drumsticks is Rs 300 per kg in Pune
Retail price Drumsticks is Rs 300 per kg in Pune 
पुणे

अहो, ऐकलत का? बाजारात शेवग्याचा भाव एवढा...

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : पावसामुळे शेवग्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नविन हंगाम सुरू होण्यास अजून एक महिन्याचा कालावधी आहे. तसेच सध्या बाजारात शेवग्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेवग्याच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. घाऊक बाजारात शेवग्याला दहा किलोस २२०० रूपये भाव मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात किलोमागे ६० रूपयांची वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात प्रतिकिलो शेवग्याचा दर तब्बल २५० ते ३०० रूपयांवर पोहचला आहे.

नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार
यंदा पावसामुळे शेवग्याचे नुकसान झाल्याने शेवटच्या टप्प्यातील उत्पादन वाया गेले आहे. त्यामुळे सध्या बाजारात स्थानिक विभागातून शेवग्याची आवक जवळपास थांबली आहे. तर शेवग्याचा नविन हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. हा हंगाम वर्षभर सुरू असतो. सध्या बाजारात गुजरात राज्यातून दररोज २२ किलोचे ५० ते ८० बॉक्स इतकी आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक अत्यल्प असल्याने भावात वाढ होत आहे. बाजारात प्रति दहा किलो शेवग्याला २२०० रूपये भाव मिळाला गेल्या आठवड्यात हा भाव १५००-१६०० रूपयापर्यंत होता, अशी माहिती मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

शस्त्रासह पोलिस अधिक्षकांचा फोटो व्हायरल; कारवाई होणार?

बाजारात पुणे विभागासह गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून शेवगा दाखल होत असतो. सध्या बाजारात फक्त गुजरात मधूनच शेवग्याची आवक होत आहे. लांबलेल्या पावसामुळे शेवग्याचा मोहोर गेला असून शेवटच्या टप्प्यातील उत्पादन वाया गेले. त्यामुळे पुणे विभागातून आवक ठप्प झाली आहे. परिणामी बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असे चित्र असल्याने भाव तेजीत आहेत. शेवगा हा उष्ण असल्याने त्यास उन्हाळ्यात कमी मागणी असते. त्या तुलनेत थंडीमध्ये जास्त मागणी असते. त्यामुळे या काळात शेवग्याला चांगले भाव मिळत असल्याची माहिती  अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

 पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू

सध्या बाजार शेवग्याची आवक कमी होत असून दर्जेदार शेवग्याचे प्रमाण कमी आहे. थंडीमुळे मागणी जास्त आहे. गृहिणी कडून शेवग्याला अत्यल्प मागणी आहे. गृहिणी खरेदी करताना पाव किलो खरेदी करतात. त्यामुळे सध्या पावकिलो शेवग्याला ७० ते ८० रूपये भाव आहे. एक किलो शेवग्याची २५० ते ३०० रूपयांनी विक्री केली जात आहे.
प्रकाश ढमढेरे, किरकोळ विक्रेते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT