कुशल आयटीयन्स टिकवण्यासाठी पुन्हा रिटेनशल बोनस देण्यास सुरवात sakal
पुणे

कुशल आयटीयन्स टिकवण्यासाठी पुन्हा रिटेनशल बोनस देण्यास सुरवात

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे : आयटी कर्मचा-याने नोकरी सोडून दुस-या कंपनीत जाऊ नये यासाठी त्यांना पुन्हा रिटेनशल बोनस देण्यास सुरवात झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या दुस-या लाटेत अनेकांच्या नोक-या गेल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा भरती सुरू झाल्याने आपल्याकडील कुशल कर्मचारी दुसरीकडे जाऊ नये म्हणून हा फंडा कंपन्या पुन्हा आजमावू लागल्या आहेत.

कोरोना सुरू झाल्यानंतर अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. त्यामुळे आहे ती नोकरी टिकवण्यावर आयटीयन्सचे लक्ष होते. पहिल्या आणि दुस-या लाटेच्या काळात नवीन भरती जवळपास बंदच होती. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने परदेशातून येणारे प्रोजेक्ट वाढले आहेत. त्यामुळे येथील कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्‍यकता भासू लागली आहे. त्यातून आता आयटीमधील नोक-यांचे मार्केट पुन्हा खुले होत असल्याने अनेक कर्मचारी नवीन नोकरीच्या संधीत आहेत. मात्र एखाद्या कर्मचा-यांचे काम चांगले असेल तर त्याला थांबविण्यासाठी हा बोनस दिला जात आहे.

रिटेनशल बोनस म्हणजे काय?

एखादा कर्मचारी नोकरी सोडून जात असेल तर त्याला कामावर थांबविण्यासाठी रिटेनशनल बोनस दिला जातो. संबंधित कर्मचा-याला पगारवाढ देणे शक्य नसल्याने त्याला या बोनसद्वारे दरमहा ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम तिमाही किंवा सहामाही पद्धतीने देखील देण्यात येते. हा बोनस देताना कर्मचा-याने किती दिवस कामावर थांबायचे याचा करार केला जातो. करार संपण्याच्या आधी नोकरी सोडली तर बोनस कर्मचा-याला परत करणे बंधनकारक असते.

प्रोजेक्टची संख्या वाढल्याने आता अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी नवीन ठिकाणी जॉईन होत आहे. त्यांना थांबविण्यासाठी पूर्वीपासून ही पद्धत वापरली जात आहे. मात्र कोरोना सुरू झाल्यापासून रिटेनशल बोनस देण्यात येत नव्हता. आता तो पुन्हा देण्यास सुरवात झाली आहे. एखादे विशिष्ट तंत्रज्ञान माहिती असलेला कर्मचारी दुसरीकडे जाऊ नये यासाठी कंपनी हा बोनस देते.

- पवनजीत माने, सदस्य, राज्य आयटी कमिटी

"मी गेल्या १० वर्षांपासून एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करीत आहे. गेल्या महिन्यात मला एका दुस-या कंपनीत कामाची संधी मिळाली होती. त्यांची आॅफर मी स्वीकारली होती. मात्र सध्याच्या कंपनीने मला रिटेनशल बोनस दिला. त्यामुळे तुर्तास तिकडे जॉईन होण्याचा निर्णय थांबवला आहे. नवीन संधी उपलब्ध होत असल्याने कर्मचा-यांचा फायदा होत आहे."

- हितेश एस., आयटी कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT