Dr.Laxmi_Narasimhan 
पुणे

व्हेंटिलेटर अभावी शास्त्रज्ञाचा करुण अंत; पुण्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधेचा आणखी एक बळी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू होण्याची घटना शहरात बुधवारी (ता.१५) पहाटे घडली. मृत्यूनंतर त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. 

डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन (वय 61) यांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

डॉ. लक्ष्मी घरात असताना त्यांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे नगर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी डॉ. लक्ष्मी यांना अन्यत्र हलविण्यास सांगितले. 

नातेवाईकांना शहरातील रुग्णालयांत बेड मिळेना. त्यामुळे त्यांनी शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते रमेश अय्यर यांच्याशी संपर्क साधला. अय्यर यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात चौकशी केली. त्यांना शहरातील रुग्णालये आणि तेथे असलेल्या सुविधा, रुग्ण संख्या यांचा डॅशबोर्ड मिळाला. त्यानुसार व्हेंटिलेटर असलेल्या चार रुग्णालयांत त्यांनी चौकशी केली. परंतु, कोठेही व्हेंटिलेटरसह बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे अखेर रात्री नऊच्या सुमारास त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले.

ससून रुग्णालय प्रशासनाने डॉ. लक्ष्मी यांना दाखल करून घेतले. परंतु, तेथेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हता. त्यासाठी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक अरविंद शिंदे यांनीही ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधला. परंतु, व्हेंटिलेटरसाठी या पूर्वीच तीन रुग्ण वेटिंगमध्ये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. लक्ष्मी यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान डॉ. लक्ष्मी यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. मृत्यूनंतर त्या चाचणीचा अहवाल आला. त्यात डॉ. लक्ष्मी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता असे आढळले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अय्यर म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या शहरात वाढत चालली आहे. परंतु, त्यांच्यासाठी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. व्हेंटिलटरचे बेडच शहरात अपुरे आहेत. स्मार्ट सिटीच्या डॅश बोर्डवर ज्या ठिकाणी व्हेंटिलटर बेड उपलब्ध आहेत, असे दाखविण्यात आले, तेथे संपर्क साधल्यावर बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मग डॅशबोर्डचा उपयोग काय, नागरिकांनी जायचे कोठे? याला जबाबदार कोण? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या बाबत विभागीय आयुक्त, धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर रांगा ;दिवाळीसाठी गावाकडे धाव ; हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील स्थिती

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Latest Marathi News Live Update: इंधनाची गुणवत्ता आणि वापराबाबतच्या तक्रारींची सविस्तर चौकशी सुरू- मुख्यमंत्री डी. के शिवकुमार

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Onion Prices: कांदा उत्पादक खूश;चाकणमध्ये व्यापाऱ्यांकडूनही समाधान व्यक्त; प्रतिकिलोस मिळाले ४४ रुपये

SCROLL FOR NEXT