पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष घातले अन्...

मिलिंद संगई, बारामती

बारामती : आयुष्यभराची कष्टाने जमवलेल्या पुंजीवर डल्ला मारणा-या बारामतीतील तिघांना पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर त्या बहाद्दरांनी जमीन पुन्हा मूळ मालकांना परत दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर फलटण तालुक्यातील निवृत्त शिक्षकांना दिलासा मिळाला. बारामतीत दहा शिक्षकांनी सन 2011 मध्ये वीस गुंठे जमीन खरेदी केली होती. या शिक्षकांना ही जमीन विकायची होती. या कामी बारामतीतील तिघांनी त्यांना चार व्यवहारात मदत केली होती. हे चारही व्यवहार चोखपणे झाल्याने त्या तिघांनी या शिक्षकांचा विश्वास संपादन केला होता. जमिनीचा शेवटचा व्यवहार करताना त्यांनी या पैकी तिघांना 14 लाखांचा धनादेश दिला होता व व्यवहार झाल्यावर उर्वरित रक्कम अदा करु असे आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात व्यवहार झाल्यानंतर ही एक कोटी 28 लाख रुपयांची रक्कम देण्यास या तिघांनी साफ नकार दिला. ही रक्कम देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरु केल्यानंतर या शिक्षकांनी थेट बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अजित पवार यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले.

दरम्यान, त्या नंतर पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, फौजदार बाळासाहेब जाधव, पोलिस कर्मचारी गोपाळ ओमासे, अंकुश दळवी, आबासाहेब चौधर यांनी या तिघांना पोलिस ठाण्यात पाचारण केले. चौकशीनंतर पोलिसी हिसका बसल्यावर त्या तिघांनीही तातडीने खरेदीखत करुन घेतलेली जमिन पुन्हा तीन निवृत्त शिक्षकांच्या नावावर करुन दिली. या तिघांमध्ये बारामतीतील एका प्रतिष्ठीताच्या चिरंजिवांचाही समावेश होता. अजित पवार यांनी गांभीर्याने या विषयाकडे पाहिल्याने फलटणच्या निवृत्त शिक्षकांना अवघ्या दोनच दिवसात न्याय मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT