lohgaon.jpg 
पुणे

परतीच्या पावसाने लोहगाव -वाघोली रस्त्याला आले नदीचे स्वरूप

सुषमा पाटील.

रामवाडी (पुणे) : लोहगाव येथे वाहणारे  नैसर्गिक ओढे नाले बुजवून चुकीच्या पद्धतीने केलेल्या बांधकामांमुळे दरवर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. लोहगाव वाघोली रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पावसाळी तसेच ड्रेनेज लाईन बसवण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवासी करत आहे. काल ( ता. 18 ) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लोहगाव वाघोली या मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोहगाव महापालिकेच्या हद्दीत येऊन ही महत्त्वाच्या सोयी सुविधा अभाव आहे. दादाची वस्ती, गुरुद्वार कॉलनी, दत्तमंदिर परिसर हा 40 वर्षीपासून महापालिकेच्या हद्दीत असून ही पावसाळी तसेच ड्रेनेज लाईन न टाकल्याने जागोजागी पाणी साचते. 
येथील रस्ते पूर्ण पाण्याखाली गेल्याने दुचाकी चारचाकी गाड्या बंद पडत होत्या. जलमय स्त्यावरून जाताना खड्डयाचा अंदाज माहित नसल्याने अनेक किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत होते. पावसाळ्यात येथील नागरिकांच्या घरात सोसायटयात पाणी शिरते. रस्त्यावर गुडघ्या एवढ्या पाण्यातून जावे लागते. खूप दिवस रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने डासांचे प्रमाण अधिक वाढते. साचलेल्या पाण्यातून चालत गेल्याने त्वचेचे  विकार ही काहींना जडतात. सदर ठिकाणचे कामे लवकरात लवकर पुर्ण करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करित आहे. 


नागरिकांना  दरवर्षी हा त्रास सहन करावा लागत असल्याने सदर ठिकाणी पावसाळी व ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण करावी.

-मेघा पोवार, स्थानिक रहिवासी    

 

पावसाळी लाइनच्या कामा संदर्भात पुणे महानगर पालिकेच्या मुख्य खात्याला पत्र देण्यात आले आहे. बजेट मिळाल्यानंतर तातडीनं कामे पूर्ण केली जातील  
-सुहास जगताप, सहायक आयुक्त, नगररोड क्षेत्रिय कार्यालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT