Students_College 
पुणे

Sakal Impact: पुणे विद्यापीठ जाहीर करणार सुधारीत निकाल; विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

ब्रिजमोहन पाटील

पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळणे, परीक्षा देऊनही अनुपस्थितीत दाखवणे असे प्रकार घडले आहेत. अशा सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा सुधारीत निकाल १५ डिसेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. 

'सकाळ'ने याबाबत 'शून्याचा तिढा कायम' या मथळ्याखाली विद्यार्थांची कैफियत मांडली होती. त्यानंतर विद्यापीठाने सुधारीत परिपत्रक सोमवारी (ता. ७) जाहीर केले आहे. 

पुणे विद्यापीठाने ऑक्‍टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा घेतली. ही सर्व परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेतली. या परीक्षेच्या निकालात अनेकांना गैरहजर दाखविण्यात आले तर, अनेकांना शून्य गुण व कमी गुण मिळाले असल्याचे समोर आले. यामुळे सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी  विद्यापीठाकडे आपल्या तक्रारी केल्या. या विद्यार्थ्यांचे सुधारीत निकाल ३ डिसेंबर पर्यंत जाहीर केले जातील असे परीक्षा विभागाने सांगितले. पण या सुधारीत निकालात पूर्वीच्याच चुका कायम होत्या.

त्यामुळे याविरोधात युवक क्रांती दलाने सोमवारी विद्यापीठात आंदोलन केले. परीक्षा विभागाला धारेवर धरून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी करत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन दिले.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक काढले आहे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. तांत्रिक प्रक्रियेचा अवलंब करीत सुमारे ५ ते ६ हजार विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल १५ डिसेंबरपर्यत जाहीर होतील. तसेच या व्यतिरिक्‍त विद्यार्थ्यांना अजून काही तक्रारी असतील, त्यांनी osd.exm@unipune.ac.in यावर ९ डिसेंबरपर्यंत इमेल कराव असेही आवाहन काकडे यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT