rice.jpg
rice.jpg 
पुणे

आंबेमोहोर, इंद्रायणीचा सुगंध दरवळणार पण...

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि भारताच्या तुलनेत अन्य देशातून बिगर बासमती तांदळाची निर्यात जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भारतातून आंबेमोहोर, मसुरी, सोनामसुरी, बॉईल्ड राईस, इंद्रायणी यासह सर्व प्रकारच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात ३३ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०१९-२० मध्ये भारतातून ५०.३५ लाख टन इतकी निर्यात झाली. त्यामुळे फक्त १४३५० कोटींची उलाढाल झाली आहे.  

मागील वर्षी भारतातील नॉन बासमती तांदळाचे दर इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त होते. तसेच जागतिक निर्यातीच्या स्पर्धेत चीन, इंडोनेशिया, मलेशिया सारख्या देशांनी भारतापेक्षा कमी दरात नॉन बासमतीची निर्यात केल्यामुळे यंदा बिगर बासमती तांदळात मोठी निर्यात घट झाली आहे. चालू वर्षात नॉन बासमती तांदळाची निर्यात वाढवायची असेल तर सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच नॉन बासमती तांदळाचे दर इतर निर्यातदार देशांच्या दरांच्या बरोबरीने ठेवावे लागतील. तसे झाले नाही तर चालू आर्थिक वर्षातही नॉन बासमती तांदळाची निर्यात अजून घटणार असल्याचे मत मार्केट यार्डातील व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केले.

भारतातून आंबेमोहोर, कालीमुछ, इंद्रायणी हे जे केवळ भारतात पिकवले जातात. त्यामुळे याच तांदळाची निर्यात होईल. तसेच डॅश, मसुरी, IR-64 इत्यादी तांदूळ जगातील इतर देश भारतापेक्षा कमी दराने निर्यात करतात म्हणून भारतातील बिगर बासमती तांदळाची निर्यात घटत चालली असल्याचेही शहा यांनी सांगितले.
 

एका बाजूला यंदा कोरोनामुळे व्यापारावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे खूप मोठे नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागणार आहे. निर्यात वाढवण्यासाठी सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.
- राजेश शहा, तांदळाचे व्यापारी, मार्केट यार्ड. 
 

वर्ष        निर्यात टनामध्ये      उलाढाल 
२०१७-१८   ८६.३५ लाख        २२९३० कोटी रुपये
२०१८-१९   ७५.३५ लाख        २०९०० कोटी रुपये
२०१९-२०   ५०.३५ लाख       १४३५० कोटी रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT