पुणे

पुणे : सर रिचर्ड रॉबर्ट्स, डॉमिनिक टायलडेस्ले यांचे विद्यापीठात होणार व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्ब्युबेशन अँड लिंकेजेस आणि डिपार्टमेंट ऑफ इंटर-डिसिप्लिनरी स्टडिज् यांच्या वतीने जगतविख्यात शास्त्रज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. त्यात नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड रॉबर्ट्स आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे माजी अध्यक्ष प्रोफेसर डॉमिनिक टायलडेस्ले यांचा समावेश आहे. ही व्याख्याने 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठ आवारातील आयुका येथील चंद्रशेखर सभागृहात होणार आहेत.

प्रो. (डॉ.) रिचर्ड रॉबर्ट्स हे “वे टू नोबेल प्राईझ” या विषयावर बोलणार आहेत. ते युनायटेड किंगडमचे नागरिक आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन केले आहे. ते बेवर्ली येथील न्यू इंग्लंड बायोलॅब या संस्थेचे प्रतिनिधित्व करतात. ते, त्यांचा नोबेल पुरस्कारापर्यंतचा प्रवास मांडणार आहेत. त्यांना विज्ञानात रस कसा निर्माण झाला.

तसेच, ते व्यावसायिक बिलियर्ड खेळाडू होण्यापर्यंत कसे पोहोचले अशा अनेक गोष्टींवर ते प्रकाश टाकणार आहेत. त्यांची कारकीर्द परंपरागत संशोधक ते आर्थिक-व्यावहारिक प्रेरणा असलेल्या उद्योगापर्यंत घडत गेली. ते न्यू इंग्लंड बायोलॅब्ज या नफा कमावणाऱ्या कंपनीत काम करत आहेत. त्याद्वारे ते त्यांचे व्यवसाय आणि जीवन याबाबतचे तत्वज्ञान, आर्थिक यशामुळे कल्पकतेला कसा निधी मिळू शकतो, त्याचबरोबर करियर घडवत असताना नशिबाला असलेले महत्व या विषयांवरही ते बोलणार आहेत.

प्रो. डॉमिनिक टायलडेस्ले हे कम्प्युटर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन या विषयातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ आहेत. ते रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे 40 वर्षांहून अधिक काळ सदस्य होते. त्यांना लहानपणापासूनच केमिस्ट्री (रसायनशास्त्र) या विषयात प्रचंड रस होता. त्यांनी युनायटेड किंगडम आणि अमेरिकेतील महत्वाच्या विद्यापीठांमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातून उद्योग क्षेत्रात प्रवेश केला. ते युनिलिव्हर कंपनीच्या फिजिकल सायन्स ग्रुपचे प्रमुख होते. त्यानंतर ते डिस्कव्हर प्लॅटफॉर्मचे उपाध्यक्ष बनले. ते रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे अध्यक्ष होते.

या व्याख्यानांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक तसेच, पुण्यातील दहा प्रमुख संशोधन प्रयोगशाळांमधील संशोधक, विज्ञान क्षेत्राशी निगडित कंपन्यांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ही व्याख्याने निमंत्रितांसाठी असली तरी इच्छुक व्यक्ती info.iil@unipune.ac.in या ई-मेलवर संपर्क साधू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT