Rikshaw Accident Sakal
पुणे

जनता वसाहतीजवळ कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा; चालक बेपत्ता

रिक्षा चालक बेपत्ता असून अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पर्वती पायथ्यालगत असलेल्या जनता वसाहतीतील कालव्यात रिक्षा कोसळल्याची घटना रविवारी (ता.30) रात्री आठच्या सुमारास घडली. रिक्षा चालक बेपत्ता असून अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. (Pune Auto Rikshaw Canal Water)

अंधारामुळे शोधमाेहिमेत अडथळे आले असून कालव्यालगतच्या रस्त्यावर भरधाव वेगाने निघालेल्या रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

रिक्षा कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रमोद साेनवणे, प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, कोळी, सचिन जवंजाळे, महेंद्र सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम राबविली. कालव्यालगत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रखर प्रकाशझोताचा वापर करून जवानांनी रिक्षाचा शोध‌ ‌घेण्यास सुरूवात केली. काही अंतरावर रिक्षा सापडली आहे. मात्र रात्री उशिरापर्यत रिक्षाचालकाचा शोध लागलेला नाही. रिक्षाचालक वाहून गेल्याची शक्यता असून अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडथळा आल्याचे केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: आता पालकांना मोबाईलवर दिसणार शाळेची बस; महाराष्ट्रात नवे नियम लागू, नियम न पाळल्यास परमिट रद्द होणार

FDA Crackdown: एफडीए कारवाईवर उच्च न्यायालयाची झापड; पंचतारांकित हॉटेलला दिलासा, परवाना निलंबन पुनर्विचाराचा आदेश

Gangapur Water Supply: नऊ वर्षांनंतर गंगापूरचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू; वाढत्या लोकसंख्येसाठी ८.५ एमएलडी नवीन पाणीपुरवठा योजनेची तयारी

मुलीच्या प्रेमविवाहाचा राग; तरुणाला बेदम मारहाण, जळत्या चितेवर फेकून दिलं...

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक कुटुंबासाठी स्वतःची स्वप्नं ठेवतात बाजूला; पण नशीब त्यांना उशिरा का होईना देतं मोठं फळ

SCROLL FOR NEXT