Rickshaw Driver broken the teeth of Two wheeler driver in pune 
पुणे

'कट' मारणाऱ्या रिक्षाचालकास जाब विचारले म्हणून दुचाकीस्वाराचे दगडाने पाडले दात !

सकाळवृत्तसेवा

पुणे ः रस्त्यावरुन ये-जा करताना कधी ओव्हरटेक केल्यामुळे, तर कधी आडवे वाहन घातल्यामुळे वाहनचालकांमध्ये शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सातत्याने घडतात. परंतु पुण्यातील एका घटनेत भरधाव रिक्षाने दुचाकीला 'कट' मारल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने रिक्षाचालकाने रस्त्यावरचा दगड उचलून थेट दुचाकीस्वाराचे दात पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

सुमीत शेळकंदे (वय 21, रा.धानोरी) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर तोहीब शेख (रा.लोहगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सुमीत हा त्याच्या दुचाकीवरुन रविवारी सायंकाळी त्याच्या मित्राकडे त्याने उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी जात होता. त्याची दुचाकी धानोरी-लोहगाव रस्त्यावर आली. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या रिक्षाने सुमीतच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे सुमीतचा तोल जाऊन त्याची दुचाकी खाली पडली. त्यामुळे सुमीतने रिक्षाचालक तोहीब शेख यास "तुला रिक्षा नीट चालविता येत नाही का? अशा शब्दात जाब विचारला. त्याचा राग आल्याने तोहीबने रस्त्यात पडलेला दगड उचलून सुमीतच्या तोंडावर फेकून मारला. या घटनेत सुमीतचे दोन दात पडल्याने तो जखमी झाला. या घटनेनंतर नागरीकांनी त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जाऊन रिक्षाचालकाबाबत फिर्याद दिली.

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक लहू सातपुते करीत आहेत. दरम्यान, शहरात रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरीकांशी किरकोळ स्वरुपाच्या कारणांवरुन भांडणे काढत त्यांना मारहाण करण्याचे प्रकार काही दिवसांपासून घडत असल्याची सद्यस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT