A rickshaw driver masturbates in front of a woman in Pune 
पुणे

पुण्यात रिक्षाचालकाने केले महिलेसमोर हस्तमैथून

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महिलेकडे पाहून  हस्तमैथून केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू सोसायटीसमोर घडली. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच 12, क्‍यु.आर.1471) या क्रमांकाच्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

Video : पुण्यात लँण्ड माफीयांचा जमीन बळकवण्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद 

फिर्यादी महिला रविवारी (ता.15) रात्री नऊच्या सुमारास पतीसह सोसायटीबाहेरील एका दुकानात पाव खरेदी करण्यासाठी गेली होती. दरम्यान, त्यांचे पती शेजारील दुसऱ्या दुकानात दूध आणण्यासाठी गेले. तर फिर्यादी पाव खरेदी करून बाहेर येत असताना आरोपीने त्यांच्याकडे पाहून  हस्तमैथून केले. फिर्यादीने पतीला बोलाविले असता आरोपी तेथून पसार झाला.

कॅब विरोधात आंदोलनाचा प्रयत्न केल्याने फर्ग्युसनच्या 2 विद्यार्थ्यांना नोटीस

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.16) पुन्हा दुपारी एक वाजता फिर्यादी व त्यांची मैत्रीण एका कॉफी शॉपवर थांबल्या असताना रिक्षाचालक त्याठिकाणी आला. त्याने पुन्हा फिर्यादीकडे पाहून हस्तमैथून केले. त्यानंतर संबंधित महिलेने त्या रिक्षाचा क्रमांक घेवून सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT