पुणे

...अन् रिक्षाचालकांनी दिला विजय मल्ल्याचा फोटो भेट; असं का घ़डले वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे :  बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून जबरदस्तीने होणार्‍या कर्जवसुलीला कंटाळून रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाचा विजय मल्याचा फोटो भेट देऊन निषेध व्यक्त केला.

दरम्यान, फायनान्स कंपन्यांची गुंडागर्दी बंद करण्यात यावी तसेच राज्य सरकारने रिक्षाचालकांना अनुदान द्यावे, अशी मागणी करीत 'बघतोय रिक्षावाला' या रिक्षा चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले.

फायनान्स कंपन्या गुंड पाठवून रिक्षाचालकांकडून कर्जाच्या हप्त्याची रक्कम भरण्यास जबरदस्ती करीत आहेत. परंतु फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या गुंडागर्दीकडे सरकार डोळेझाक करत आहे.

फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून धमक्या मिळत असतील तर कर्जदारांनी विजय मल्ल्या का बनू नये? दिल्ली, आंध्र प्रदेश व इतर काही राज्यांनी रिक्षाचालकांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक साहाय्य केले. परंतु सरकारने रिक्षाचालकांना वाऱ्यावर सोडले आहे.

राज्य सरकारने रिक्षाचालकांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत करावी. त्याशिवाय कोणीही रिक्षाचालक फायनान्स कंपनीचे हप्ते आता भरणार नाहीत, असा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिला.

या आंदोलनात उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्यासह अन्य रिक्षाचालक सहभागी झाले होते. रिक्षाचालकांकडून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या :
- सर्वोच्च न्यायालय आणि निर्देश धुडकावून गरीब अल्पशिक्षित कर्जदारांवर गुंडागर्दी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांना समज द्यावी.  
- रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी.  
- कोरोना संकट काळात रिक्षाचालकांना 15 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी   
- नवीन रिक्षा परमिट देणे बंद करावेत. 

सध्या ग्राहक कमी असल्यामुळे रिक्षाचा व्यवसाय होत नाही. दोन रुपये कमाई होत नाही, तर बँक आणि फायनान्सचे हप्ते कसे भरणार? मुंबई, दिल्लीवरून फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे फोन येतात. हप्ते भरा अन्यथा गाडी उचलून नेऊ. घरी पोलिस येतील, अशा धमक्या दिल्या जातात.
-मायकेल शिरसाट आणि विपुल मुळे, रिक्षाचालक

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT