Rikshaw 
पुणे

पुणे विद्यापीठातर्फे रिक्षा स्टँड डिझाइन स्पर्धा; विद्यार्थी, शिक्षक सादर करणार डिझाइन

सकाळवृत्तसेवा

पुणे : चौकाचौकात असलेले रिक्षा स्टँड अजून सुंदर कसे बनविता येतील, त्यांची रचना कशी असली पाहिजे यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली आहे. डिझाइन क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक हे डिझाइन सादर करणार आहेत. पुणे विद्यापीठाचे समाजशास्त्र विभाग आणि व्हीआयटीचे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टचर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे. समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांच्या 'कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून “चला आपले शहर स्मार्ट, समावेशक, शाश्वत आणि सुरक्षित बनवू” या संशोधन प्रकल्पांतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर असणार असून, ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)’ यांचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेचे पोस्टर अनावरण मंगळवारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. श्रुती तांबे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, व्हीआयटीचे अध्यक्ष ऍड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पटालिया, संचालक  प्रसन्न देसाई, शेखर गरुड आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. तांबे म्हणाल्या, या स्पर्धेसाठी 10 एप्रिल पर्यंत नोंदणी करायची असून, विद्यार्थी, शिक्षकांनी त्यांचे प्रस्ताव 20 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आहेत. याबाबत सविस्तर माहिती विभागाच्या व व्हीआयटीच्या  इन्स्टाग्राम व फेसबुक पेजवर  मिळेल.  या स्पर्धेचे परीक्षण पर्यावरण, डिझाइन, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व इतर तज्ज्ञ करणार आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT