Aashae 
पुणे

समाजाने नाकारलेल्या मुलींना 'हक्काचं घर'

सनील गाडेकर

पुणे - प्रेमात पडल्यानंतर झालेल्या शरीर संबंधातून, ओळखीच्या किंवा अज्ञात व्यक्तीने केलेल्या बलात्कारामुळे ‘ती’ गर्भवती राहिली. लादलेलं हे मातृत्व काहींनी नाइलाजास्तव तर काहींनी बाळाची जबाबदारी घेत मोठ्या आव्हानानं स्वीकारली. मात्र तिच्यावर बेतलेल्या या प्रसंगामुळे कुटुंब आणि नातेवाइकांनी साथ सोडली. अचानक निराधार झालेल्या या दोन जिवांचा कोण सांभाळ करणार?, या चिंतेत असलेल्या अनेक कुमारी मातांना ‘आशाई’नं हक्काचं घर दिलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुमारी मातांच्या आयुष्यातील समस्यांचा डोंगर कमी होऊन त्यांना निवारा मिळण्यासाठी ‘माहेर’ संस्थेने ‘आशाई’ प्रकल्प सुरू केला. संस्थेच्या वाघोली येथील पुनर्वसन केंद्रात सध्या सहा मुली वास्तव्यास आहे. याबाबत प्रकल्पप्रमुख वर्षा भुजबळ म्हणाल्या, ‘‘कुमारी मातांचं वय हे मुळात खूप कमी असतं. गर्भवती किंवा मूल झाल्यानं पुढील आयुष्य कसं जगायचं?, असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. त्यामुळे कुमारी मातांना धीर देऊन त्यांचा सांभाळ करण्याचं काम या प्रकल्पातून सुरू आहे. एखादी गर्भवती किंवा बाळ झालेली मुलगी प्रकल्पात दाखल झाल्यानंतर तिला परिस्थिती समजावून सांगत मनोबल वाढविण्यात येतं.’’

काय करतेय आशाई संस्था...

  • आत्तापर्यंत ५८६ कुमारी मातांचा सांभाळ 
  • सध्या सहा मुली वास्तव्यास
  • चिंतेत असलेल्या मातेचं होतेयं समुपदेशन
  • योग्य जोडीदार मिळाल्यास लग्नही लावून दिले जाते
  • काही मुलींची पुन्हा घरवापसी
  • निराधार मुलींचे संस्था स्वीकारते पालकत्व

संबंधित मुलाला जर ‘तिचा’ सांभाळ करायचा असेल तर त्याचं पालनपोषण कसं करावं, याबाबत मार्गदर्शन करतो. मात्र, तिला जर मुलाला सांभाळणं शक्‍य नसेल तर महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून त्याला दत्तक देण्यात येतं. चांगलं कुटुंब मिळालं तर या मुलींचं लग्नही लावून देतो. तसेच, काहींना त्यांच्या कुटुंबाने परत नेलं आहे. मात्र, ज्या मुलींचा कोणीच सांभाळ करायला तयार नाही किंवा तिला कोठे जाण्याची इच्छा नसेल तर तिचा संस्थेमार्फत सांभाळ केला जातो.
- वर्षा भुजबळ, प्रकल्प प्रमुख, ‘आशाई’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT