pune sakal
पुणे

Pune News : बालवाडीतील चिमुकल्याचा थरार ; स्केटिंगमध्ये चौफुल्याच्या ऋत्विक कुंभारचा विक्रम

चौफुला ( ता. दौंड ) येथील ऋत्विक पराग कुंभार ( वय ५ ) याने लिंबो स्केटिंग मध्ये विक्रम केल्याची माहिती पंच विशाल देसाई यांनी दिली. केडगावच्या ग्रेट स्पोर्ट्स ॲकॅडमीत कुंभार हा स्केटिंगचे धडे घेत असून तो शारदा सदन शाळेत बालवाडीत शिकत आहे.

रमेश वत्रे

केडगाव : चौफुला ( ता. दौंड ) येथील ऋत्विक पराग कुंभार ( वय ५ ) याने लिंबो स्केटिंग मध्ये विक्रम केल्याची माहिती पंच विशाल देसाई यांनी दिली. केडगावच्या ग्रेट स्पोर्ट्स ॲकॅडमीत कुंभार हा स्केटिंगचे धडे घेत असून तो शारदा सदन शाळेत बालवाडीत शिकत आहे. लिंबो स्केटिंग म्हणजे स्केटिंग वरती स्ट्रेच करत पुढे जाणे. ऋत्विकने ७ क्रेटा ( मोटार ) गाड्या व ७ ज्वलंत लोखंडी पाईप ( फायर बार ) खालून जमिनी पासून ९ इंचावरून जाऊन ५० मीटर अंतर अवघ्या १९ सेकंदात मध्ये पूर्ण केले. हा या क्षेत्रातील विक्रम ठरला आहे.

ग्लोबल जिनियस रेकॉर्ड या जागतिक रेकॉर्डच्या नोंद करणाऱ्या संस्थेने या विक्रमाची नोंद घेतली आहे. या संस्थेच्या माध्यमातून निरीक्षक म्हणून विशाल देसाई आले होते. देसाई म्हणाले, "ग्रामीण भागात हा खेळ फारसा खेळला जात नाही. अशा रेकॅार्डसाठी आम्ही तीन ट्रायल देत असतो. मात्र ऋत्विकने ट्रायल न घेता पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. या खेळात शाररिक फिटनेस व मनाच्या एकाग्रतेचा कस लागतो. "

अॅकॅडमीचे समाधान दाणे म्हणाले, "संत सेवा संघाच्या माध्यमातून ग्रेट स्पोर्ट्स अॅकॅडमी ग्रामीण भागातील मुलांना साहसी खेळ शिकवण्याचे काम करते. स्केटिंग हा खेळ ग्रामीण भागात अभावानेच खेळला जातो. अशा खेळात विक्रम होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अॅकॅडमी माध्यमातून कराटे, मर्दानी खेळ, रायफल शुटिंग, धनुर्विद्या, स्केटींग शिकवले जाते."ऋत्विकला ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी चे समाधान दाणे, गणेश घुगे, यश बारवकर, आकाश कसबे, खुशनंदन सिंग यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT