velhe.jpg 
पुणे

काय सांगता...! वेल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; तोरणा किल्ल्याचा रस्ताच गेला वाहून 

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यात काल (ता. 10) रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान पावसाने तुफान बॅटिंग केली. पावसाचा जोर एवढा होता की तोरणा किल्ल्यावर जाणारा नवीन रस्ता पाण्यामुळे वाहून गेला. तर, वेल्हे बाजारपेठेतील सर्व दुकानांमधील पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील व्यापाराचे प्रचंड नुकसान झाले आहे 

वेल्ह्यात काल अवघ्या काही तासात 64 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तोरणा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर बाजूचा राडारोडा वाहून आला असून, डांबर पाण्याच्या प्रवाहाने निघून मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या कडेने पाणी जाण्यासाठी गटारे काढली नसल्याने रस्त्यावर राडारोडा आला आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे नाल्यांना नदीचे स्वरूप आले आहे. वेल्हे बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पाण्याबरोबर चिखल गाळ वाहून आल्याने संपूर्ण बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले.

शिव गोरक्ष गॅस एजन्सीसमोर सगळीकडे माती वाहून आली असून, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. 
वेल्हे तालुक्यात अवघ्या दोन तासात पडलेल्या पावसाने वेल्हे बाजारपेठमध्ये पाणी घुसले होते. परंतु, शेतीचे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही, अशी माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. तोरणा किल्ल्यावरील रस्ता वाहून गेल्याने किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना मोठा मनस्ताप होणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते गोरख भुरूक यांनी सांगितेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government talks CJP : सोनम वांगचुकनी उपोषण सोडल्यानंतर मोठी घडामोड! कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकार चर्चेला तयार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

Spinach Cheese Sweet Corn Mini Paratha: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट! पालक-चीज-स्वीट कॉर्नचे मिनी पराठे एकदा नक्की ट्राय करा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चेनंतर २६ दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

SCROLL FOR NEXT