mahad 
पुणे

वाहनचालकांनो सावधान, वरंधा घाटात दरड कोसळली...  

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळल्यामुळे रस्त्याच्या दरीच्या बाजूकडील संरक्षक कठडा ढासळला आहे. गुरुवारी (ता. २) रात्री किंवा शुक्रवारी (ता. ३) पहाटे घाटमाथ्यावरील वाघजाई मंदिराजवळ भोर बाजूकडे सुमारे २०० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भोरचे उप अभियंता आर. एल. ठाणगे यांनी माहिती दिली की, संरक्षक कठडा ढासळल्याबाबत शुक्रवारी सकाळी माहिती मिळाली. त्यानंतर लगेच शाखा अभियंता शिवानंद हल्लाळे व तांत्रिक सहायक गौतम कांबळे यांनी कर्मचा-यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले दरडीचे दगड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. घाटामाथ्याच्या डोंगराच्या कड्यावरून भला मोठा दडग खाली पडला. परंतु, दगड रस्त्याच्या संरक्षक कठड्यावर पडल्यामुळे जुन्या बांधकामाचा असलेला कठड्याच्या काही भाग कोसळला गेला. त्यामुळे सुमारे चार फूट रस्ता खचला गेला. सध्या तेथे १५ फुटांचा रस्ता शाबूत आहे. त्यामुळे वाहतुकीस सध्या तरी अडथळा नाही. परंतु, पावसाचे प्रमाण वाढल्यास तेथे अपघाताचा धोका संभविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात वरंधा घाटातून जाणारी एसटी व शासकीय वाहतूक बंद आहे. मात्र, तरकारी व इतर नैमित्यिक वाहतूक सुरू आहे. याशिवाय घाटातील पावसाळी निसर्गसौदर्यांचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे घाटातील वाहतूक काही प्रमाणात सुरु आहे. मात्र, घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी घाट रस्त्यात थांबू नये आणि वाहने चालविताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT