road 1.jpg 
पुणे

बालेवाडीतील 'तो' रस्ता... महापालिका अन् स्मार्ट सिटीची टोलवाटोलवी

शितल बर्गे

बालेवाडी (पुणे) :  बालेवाडी फाटा ते बालेवाडी गावठाण या 24 मी. रुंद डीपी रस्त्याचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून सुरू असून, आता हे काम महापालिका करणार की स्मार्ट सिटी यांच्या टोलवाटोलवीमध्ये काम असेच रखडले आहे. यावर महापालिकेकडून  जागा मालक जागा ताब्यात देत नाही,  हे कारण पुढे केले जात आहे. तर इथून पुढचे राहिलेले काम स्मार्ट सिटीला करण्याची विनंती वजा पत्र महापालिकेने स्मार्ट सिटीला दिले आहे, असे सांगण्यात आले आहे. पण अजून तरी काम सुरु झालेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरचे खड्डे, पावसाच्या पाण्यातून मार्ग काढताना नाहक त्रास सहन करावा लागतो.                               

बालेवाडी येथील मुख्य रस्ता म्हणजे बालेवाडी फाटा ते बालेवाडी गावठाण या मुख्य 24 मी. डीपी रस्त्याचे काम महापालिकेकडून दोन- तीन वर्षापूर्वी सुरु करण्यात आले. सुरवातीला स्मार्ट सिटीने या कामाचे नियोजन केले होते. दरम्यान महापालिकेने या कामात पुढाकार घेतला, व हे काम पथ विभागा कडून केले जाईल असे सांगण्यात आले. पथ विभागाकडून हे काम सुरु ही झाले, पण काही स्थानिक जागा मालकांकडून भू संपादन न झाल्याने रस्त्याचे  काम रखडले. त्यामुळे महापालिके ने काही प्रमाणात प्रयत्न केल्यानंतर पालिकेने नागरिकांकडे सातत्यपूर्व पाठ पुरावा करण्यापेक्षा  ते काम स्मार्ट सिटी कडे सोपवणे सोईचे मानले. त्यामुळे मनपा कडून अर्धवट काम व स्मार्ट सिटी कडून काढून घेतलेला प्रकल्प आणि यामुळे या कामात विसंगती आल्याचे दिसते.       

या कामा संदर्भात पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि पथ विभाग पुणे महापालिका यांच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी  आॅक्टोबर २०१८ मध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत उर्वरित काम स्मार्ट सिटीने करावे अशी विनंती पथ विभागाकडून करण्यात आली. पण बैठकीनंतर कोणते काम झाले, कोणते बाकी आहे  हे नकाशा सहीत  पत्र  पथ विभागाकडून स्मार्ट सिटीला देणे अनिवार्य होते, पण तसे न केल्याने हे काम आजपर्यंत रखडले आहे. तरी प्रशासनाच्या अशा कारभारामुळे  सामान्य माणसाना नाहक त्रास सहन करावा लागतो. हे काम कोणी का करे ना, पण त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.         

या ठिकाणी  जागा मालकांकडून जागा ताब्यात न मिळाल्याने हे काम पूर्ण करता आले नाही. आता हे काम स्मार्ट सिटीकडून करण्यात यावे असे पत्र  मनपा पथ विभागा कडून स्मार्ट सिटीला देण्यात आले आहे.  

- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, मनपा 

जो पर्यंत महापालिकेकडून बालेवाडी रस्त्याचे काम काय झाले, काय राहिले या संदर्भात नकाशा सहीत, संपूर्ण तपशिल  स्मार्ट सिटीला मिळत नाही तो पर्यंत  हे काम सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करता येणार नाही.

-अरुण गोडबोले, मुख्य अभियंता, पुणे स्मार्ट सिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT