पुणे

आंबेगाव : चक्क, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामातच घोळ

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : “मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन कोटी ८९ लाख ६३ हजार रुपये निधीतून तुकानाना चौक पिंपळगाव ते खेडकर मळा अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) डांबरीकरण व कारपेटचे काम झाले आहे. अजून रस्त्यावर सिलकोट काम होणार आहे. पण पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबरीकरण व कारपेटचे थर वाहून गेले आहेत. निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबधित ठेकेदाराला अधिकारी वर्गाने बिल अदा करू नये.” अशी मागणी पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच दिपक पोखरकर व अवसरी खुर्दचे सरपंच जगदीश अभंग यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.

कंत्राटदाराकडून रस्त्यावर लावलेल्या फलकानुसार कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास पुणे यांचेकडे रस्त्याच्या कामाचा दर्जा व मूल्यमापनाची जबाबदारी आहे. रस्त्याची एकूण लांबी 3.७२० किलोमीटर आहे. १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १७ लाख 28 हजार रुपये निधीची तरतूद केली आहे. माती काम, दोन खडीचे थर, डांबरीकरणाचा थर व कारपेट काम पूर्ण झाले आहे. अजून सिलकोट चे काम होणे बाकी आहे. “आतापर्यंत झालेले काम घाईत पूर्ण केले आहे. खडीचा दर्जाहि व्यवस्थित नव्हता. सद्यस्थितीत रस्त्याला चिरा पडल्या असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी खुर्द व पिंपळगाव कडे ये–जा करण्यासाठी रस्त्याचा वापर होणार आहे. सध्या महाविद्यालय बंद आहे. अत्यंत तुरळक स्वरुपाची वाहतूक सुरु असताना व साधारण झालेल्या पावसात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.” असे ग्रामस्थ श्रीराम बांगर यांनी सांगितले. याबाबत कार्यकरी अभियंता पाटील व शाखा अभियंता राजेंद्र काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मोबाईल उचलला नाही.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अवसरी खुर्द हे गाव आमदार दत्तक म्हणून घेतले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला. पण अधिकारी वर्ग यांनी कामच्या दर्जाकडे अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे रस्ता फार काळ टिकण्याची शक्यता नाही. निकृष्ट रस्त्याच्या कामाची माहिती देण्यासाठी गावकर्यांचे शिष्टमंडळ दिलीप वळसे पाटील यांना भेटणार आहे.

-जगदीश अभंग सरपंच अवसरी खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT