Robbed Gold Loan office by threatening Pistol in chandannagar area in pune
Robbed Gold Loan office by threatening Pistol in chandannagar area in pune 
पुणे

पुणे : चंदनगरमध्ये गोल्ड लोन कार्यालयावर पिस्तूलाच्या धाकाने दरोडा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोने तारण ठेवण्याच्या गोल्ड लोन कार्यालयामध्ये गुरूवारी भर दिवसा चोरट्यांनी घुसून पिस्तुलाचा धाक दाखवित 50 लाखांहून अधिक रुपयांचे सोने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नगर रस्त्यावरील चंदननगर परिसमध्ये गुरूवारी सकाळी पावणे अकरा वाजता ही घटना घडली. 

विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत एक ठार

मागील 15 दिवसात शहरात घडलेली ही दुसरी घटना असून त्यामुळे सराफी व्यावसायिक व व्यापारी चांगलेच धास्तावले आहेत. चंदननगर परिसरामधील भाजी मार्केट परिसरामध्ये आनंद एम्पायर नावाची बहुमजली इमारत आहे. या इमारतीच्या तळघरावर 'आयआयएफएल गोल्ड लोन' या कंपनीचे कार्यालय आहे.

हॉटेल, वडापावच्या गाड्या, खानावळीतील ताटातून कांदा गायब 

नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता संबंधीत कार्यालय उघडण्यात आले. सर्व कर्मचारी कार्यालयामध्ये आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयाजवळ तिघेजण आले. एकजण बाहेर थांबला तर, अन्य दोघे कार्यालयात आले. त्या दोघांकडे पिस्तुल होती. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच एका कर्मचाऱ्यांच्या डोक्‍याला पिस्तुल लावून अन्य कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने तिजोरीतील सोने बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये सोने भरून तेथून ते पळून गेले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी चंदननगर पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली.  

 #Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT