the robber Koyata gang confessed to the murder of the cab driver 
पुणे

आधी पेट्रोल पंप लुटला नंतर नवविवाहित कॅब चालकाची केली हत्या; कोयत्या गँगला बेड्या

जनार्दन दांडगे

पुणे : लोणी काळभोर येथील शेल पेट्रोल पंपावर पाच दिवसापुर्वी दरोडा टाकण्याबरोबरच, रांजणगाव येथील एका कॅब चालकाचा कृरपणे खून करणाऱ्या रांजणगाव परिसरातील कोयत्या गॅगला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने अटक केली आहे. कॅब चालकाने गँगमधील एकाला आईवरुन शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरुन त्याचा रांजणगाव जवळील सोनेसांगवी ते मलठण रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री कोयता गँगने कोयता तसेच दगड-गोट्यांनी मारहाण करुन, निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


योगेश मच्छिंद्र गर्जे (वय 25 वर्षे, रा रांजणगाव ता शिरूर) हे त्या खून झालेल्या कॅब चालकाचे नाव असुन, या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने किरण भाऊसाहेब थिटे (वय २१ वर्षे, रा केंदूर ता. शिरूर), गौरव बाळू ढवळे (वय- २१ वर्षे, रा. अष्टापुर ता हवेली), संतोष गोरख ब्राम्हणे (वय- २० वर्षे, रा. शनिशिंगणापूर, ता नेवासा जि अहमदनगर) भाऊसाहेब गौतम कुडुक (वय- २२ वर्षे, रा. शेकटा ता. गेवराई जि बीड) व दक्षिणेस उर्फ दर्शन अनिल दांगट (वय- २१ वर्षे,  रा उंब्रज ता. जुन्नर) या कोयता गँगमधील पाच जणांना अटक केली आहे. किरण थिटे व गौरव ढवळे हे कोयता गँगचे प्रमुख असून, वरील पाचही जणांनी लोणी काळभोर येथील शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याबरोबरच, रांजणगाव येथील योगेश गर्जे या कॅब चालकाचा कृरपणे खून केल्याची कबुली दिली आहे. विशेष बाब म्हणजे खून झालेल्या योगेश गर्जे याचा चार महिन्यांपुर्वी विवाह झालेला होता. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद्ममाकर घनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे-सोलापुर महमार्गावर लोणी काळभोर हद्दीतील पेट्रोल पंपावर पाच दिवसांपुर्वी कोयता गँगने शेल पेट्रोल पंपावर दरोडा टाकला होता. यावेळी कामगारांना कोयता व लाकडी दंडुक्याच्या सहाह्याने मारहाण करुन अडीच हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल फोन लुटले होते आणि कार्यालयाची तोडफोडही केली होती. हा प्रकार सिसिटीव्ही कैद झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलिस या आरोपींच्या मागावर होते. दरम्यान हे पाचही जण रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रांजणगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने, पोलिसांनी रांजणगाव परिसरात सापळा रचून कोयता गँगला  रविवारी (ता.3) मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी पाचही जणांकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी शेल पेट्रोल पंप लुटल्याची कबुली दिली. 

योगेश गर्जे या कॅब चालकाचा खून उघड...
लोणी काळभोर येथील शेल पेट्रोल पंपावरील दरोड्याची कबुली दिल्यानंतर, आणखी काय हाती लागते का? हे पाहण्यासाठी पोलिसांनी किरण थिटे व गौरव ढवळे व त्याच्या सहकाऱ्यांची विशेष चौकशी सुरु केली. यात वरील पाचही जणांनी योगेश गर्जे या कॅब चालकाचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. योगेश गर्जे याच्या भावाची रांजणगाव गावात पानाची टपरी आहे. या टपरीवर आरोपीचे ये-जा असल्याने योगेश व आरोपी एकमेकांना ओळखत होते. शनिवारी मध्यरात्री पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्यानंतर पाचही जणांनी देवदर्शनासाठी जाण्यासाठी योगेश गर्जे याची चार-चाकी गाडी भाड्याने घेतली होती. या गाडीतून रांजणगाव जवळील सोनेसांगवी ते मलठण रस्त्यावरुन जात असताना त्यांनी योगेशला रस्त्यात उतरवून त्याचा कोयता तसेच दगड-गोट्यांनी मारहाण करत निर्दयीपणे खून केला. मारहाण केल्यानंतर, जखमी योगेशला गाडीच्या डिकीत घालून उरुळी कांचन- अष्टापुर मार्गावरील मुळा-मुठा नदीत आणून टाकले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भावाने तर सुपारी दिली नाही ना ? मृत्युसमयी जखमी योगेशची विचारना..
योगेश गर्जे यास वरील पाच जणांनी सोनेसांगवी ते मलठण रस्त्यावर मारहाण करुन, जखमी अवस्थेत उरुळी कांचन- अष्टापुर मार्गावरील भवरापुर हद्दीतील मुळा-मुठा नदीवर पुलावर आणले. नदीत टाकण्यापुर्वी योगेशने पाणी मागितल्याने, किरण थिटे याने योगेशला पाणी पाजले. यावेळी योगेशने "मला मारण्यासाठी माझ्याच भावाने तुम्हाला सुपारी दिली होती का?" विचारले. मात्र किरणने उत्तर देण्यापुर्वीच योगेश प्राण सोडले.

स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमिन, जनार्दन शेळके, विजय कांचन, मंगेश थिगळे, धिरज जाधव, अक्षय नवले व समाधान नाईकनवरे आदी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT