लोणी काळभोर (पुणे)- पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपुर (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुरुवारी (ता. ५) मध्यरात्रीच्या सुमारास एका कंटेनरच्या चालकाला मारहाण करुन, त्याच्या खिशातील पाच हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा घडल्यापासुन एका तासाच्या आत अटक करण्याचा भिम पराक्रम केला आहे.
संजय वंसत दळवी व भिमराव शशीकांत ओव्हाळ (रा. दोघेही सिंहगड रोड, पानमळा वसाहत, पुणे) ही लोणी काळभोर पोलिसांनी अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे असुन, याप्रकरणी कंटेनर चालक, अर्जुन रामसरू पटेल (वय- 30 वर्षे, रा. गौरी ता. हनमना जि. रिवा, मध्यप्रदेश यांनी यवत पोलिसात वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान वरील दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी यवत पोलिसांच्या हाती सोपवल्याची माहिती लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन पटेल हे कंटेनर चालक गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास यवत बाजुकडुन कंटेनर घेऊन पुण्याला निघाले होते. कंटेनर पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपुर (ता. दौंड) गावच्या हद्दीत आले असता, मोटारसायकलवरुन आलेल्या संजय दळवी व भिमराव ओव्हाळ या दोघांनी कंटेनर रस्त्यात थाबवण्यास अंर्जुन पटेल यांना भाग पाडले. कंटेनर थांबताच, वरील दोन्ही आरोपींना पटेल यांना मारहान करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढुन घेतले. अंर्जुन पटेल यांना लाथा बुक्क्यांनी मारहान केल्यानंतर, संजय दळवी व भिमराव ओव्हाळ या दोघांनीही मोटारसाकलवरुन पुणे बाजुकडे पळ काढला. वरील दोन्ही आरोपी जाताच, पटेल यांनी जिल्हा (ग्रामिन) पोलिसांच्या नियंत्रन कक्षाला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर नियंत्रन कक्षातील पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फोन करुन, अंर्जुण पटेल यांना मदत करण्याच्या सुचना केल्या.
दरम्यान लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर व लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजु महानोर उरुळी कांचन परीसरात गस्त घालत होते. अर्जुण पटेल यांच्याबाबत घडलेल्या घटनेची माहिती मिळताच, सुरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. घडलेली प्रकार यवत पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने, बंडगर यांनी अर्जुण पटेल यांच्यासोबत एक पोलिस कर्मचारी देऊन, पटेल या्ंना यवत पोलिसात तक्रार देण्यासाठी पाठवुन दिले. व स्वतः बंडगर व त्यांचे सहकारी आरोपींच्या शोधासाठी पुण्याच्या बाजुने निघाले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सुरज बंडगर व त्यांचे सहकारी कुंजीरवा़डी हद्दीत पोचले असता, पोलिसांना दोन जण संशयास्पद रित्या रस्त्याच्या एका बाजुला अंधारात उभे असल्याचे दिसुन आले. यावर पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेऊन, विचारपुस करण्यास सुरुवात केली. सुरवातील उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संजय दळवी व भिमराव ओव्हाळ यांनी सहजपुर हद्दीत कंटेनर चालकाला मारहान करुन, त्याच्याकडील पैसे लुबाडल्याची कबुली दिली. यावर लोणी काळभोर पोलिसांनी वरील दोन आरोपी व त्यांनी पटेल यांच्याकडुन लुबाडलेले पाच हजार रुपये यवत पोलिसांच्या हवाली केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.