A robbery attempt at a bank in Nira Narsimhapur has failed.jpg 
पुणे

नीरा नरसिंहपूरमध्ये बँकेत दरोड्याचा प्रयत्न यामुळे फसला

सकाळ वृत्तसेवा

नीरा नरसिंहपूर : येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान मंदिरात असलेल्या बँक ऑफ बडोदा ( पुर्वीची देना बँक) फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यासंदर्भात बावडा पोलिस तपास करण्यासाठी पोहोचले आहेत. रात्रीचा चोरीचा प्रयत्न सकाळी सहा वाजता वॉचमनचा पाहणीनंतर कळला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान मंदिरात मागील अनेक वर्षापासून देना बँक आताची बँक ऑफ बडोदा चालवली जात आहे. नरसिंहपूर परिसरातील ग्राहकांना सोईची बँक असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होत आहे. आज दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी होती. तर कालचे कामकाज करून कर्मचारी बँक दररोजच्या प्रमाणे बंद करून गेले होते. 

अंगावर शहारा आणणारी घटना; शहा येथे अंगणवाडीची भिंत कोसळली

अशी झाली चोरी

काल रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात असलेल्या बँकेचे बाहेरील सायरनच्या वायर कापून प्रथम काढून टाकला. नंतर कडी कोयंडा तोडून बँकेत प्रवेश केला. पण आत त्यांना काहीही करता आले नसल्याने त्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसल्याचे मंदिरातील काही प्रत्यक्ष दर्शि नागरिकांनी सांगीतले. बँकेत सिसिटीव्ही कॅमेरा असल्याने त्याचे फुटेज तपासण्या येणार असून पुढील नेमके काय झाले ते तपासले जाणार आहे. 

पुणे-सातारा महामार्गाने फिरायला जाताय? मग ही बातमी हमखास वाचाच...

दरम्यान, बँकेला आज सुट्टी असल्यामुळे कर्मचारी यांना यासंदर्भात कळवल्यानंतर कर्मचारी तातडीने हजर झाले आहेत. त्यांनी बावडा पोलीसांना कळवले असून सदर तपासासाठी पोलीस येणार असल्याचे समजते. परंतु चोरट्यांच्या चोरीचा पहिल्या प्रयत्न अयशस्वी झाला असून नेमकी चोरी कोणी व का व कशासाठी केली असावी अशीच चर्चा सूरू आहे. अधिकच माहीती पोलीस तपासानंतर कळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT