arrested narhe Pune 
पुणे

पुणे : दरोडा टाकायच्या आधीच टोळी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नऱ्हे परिसरातील एका सराफी दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शनिवारी पहाटे सव्वा तीन वाजता नऱ्हे परिसरात सिंहगड रस्ता पोलिसांनी ही कारवाई केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सागर बसवराज नडगिरे (वय 19), शुभम सचिन उफाळे (वय 20, दोघेही रा. वडगाव बुद्रूक), राहूल गंगाराम मरगळे (वय 19 , रा. शिरकुले, हवेली), समीर मोहन चांदेकर (वय 20), सागर शरनम रणसौरे (वय 20), हर्षद गणेश जातेगावकर (वय 21, तिघेही रा. धायरी), शुभम सुनिल चव्हाणे (वय 21, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे यांनी फिर्याद दिली आहे. 

एक वर्षाच्या बाळाला घेऊन महिला कॉन्स्टेबल करतेय ट्रम्प यांच्या सुरक्षेचे काम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी तेलंगे व त्यांचे सहकारी शनिवारी पहाटे तीन वाजता नऱ्हे परिसरात रात्रगस्त घालत होते. नऱ्हे येथील ग्रॅडीयर सोसायटीसमोरील रस्त्यावर सात जणांचे टोळके संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांनी त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन कोयते, मिरची पुड, कटावणी, दोर, बॅटरी असे साहित्य आढळले. त्यांची अधिक चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी हे नऱ्हे परिसरातील एक सराफी दुकानावर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Pune News: नव्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले; बांधकामाला पाणी मारताना कैलास बेनके यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Maharashtra Drought: दुष्काळाची घोषणा कागदावर नको, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्या; दीपिका चव्हाण यांचा सरकारकडे आग्रह

SCROLL FOR NEXT