corona-k.jpg 
पुणे

...आता रोबोट करणार कोरोनाची प्राथमिक तपासणी, कसे ते वाचा 

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : सध्या जगभर कोरोना या महामारीने हाहाकार केला आहे. या महामारीने भारतामध्ये देखील थैमान घातले आहे. पुणे शहर आणि परिसरात दररोज या महामारीचे रूग्ण वाढत आहेत. अशा रूग्णांना विविध सेवा पुरविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआय विभागाने रिमोट कंट्रोलवर आधारित एका रोबोटची निर्मिती केली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या हा रोबोट  बोर्डाच्या पटेल रूग्णालयातील कोरोना रूग्णाच्या सेवेत कार्यरत आहे. आता मात्र आयटीआय विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकीत एका विशेष रोबोटची निर्मिती केली आहे. हा रोबोट चालता बोलता असून, कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांचे स्क्रीनिंग करणार आहे. त्याचबरोबर  शरीरामधील तापमानाची नोंद सुध्दा घेणार आहे. या रोबोटमुळे पटेल रूग्णालयामधील डॉक्टर परिचारिका यांचे काम सोपे होणार आहे. 

सध्या  कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रुग्णालय व क्वारंटाईन सेंटर मध्ये शेकडो पेक्षा अधिक पॉसिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहे. या रुग्णांना सेवा देणारे 4 कर्मचारी सध्या  कोरोनाने संक्रमित झाले असून ते ही  रुग्णालयात उपचार घेत आहे. अशा प्रकारे डॉक्टर  व  कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये व त्यांना मदत म्हणून प्रशासनाने पुढचे पाऊल टाकत, कोरोनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी एक विशिष्ट चालता बोलता रोबोटच विकसित केला आहे. यामुळे कोरोनाचे प्राथमिक निदान होण्यास मदत होणार आहे. या रोबोटची निर्मिती बोर्डाच्या आयटीआय विभागाने केली आहे.

 दरम्यान, हा चालता बोलता रोबोट नागरिकांचे स्क्रींनिग अगर तपासणीच करून थांबणार आहे, असे नाही तर तो नागरिकांना आरोग्याबाबतचे विविध प्रश्न देखील विचारणार आहे. त्यासाठी खास वेगळी यंत्रणा या रोबोटमध्ये विकसित करण्यात आली आहे. रोबोटने विचारलेल्या प्रश्नांवर नागरिकांनी उत्तरे दिल्यानंतर संबधित रूग्णांस कोरोना वॉर्डमध्ये दाखल करावयाचे की, विलगीकरण कक्षात ठेवायचे याचा निर्णय रूग्णालयातील डॉक्टर घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा रोबोट रूग्णालयातील कॅज्युअल्टीमध्ये बसविण्यात येणार आहे. रोबोट चालता बोलता होण्यासाठी संगणकीकृत यंत्रणा बसविण्यात आली असून, नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरची सोय करण्यात आली आहे.

बोर्डाच्या आय.टी.आय. विभागाने अत्यंत कुशलतेने अत्याधुनिक चालता बोलता रोबोट तयार केला आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. हा रोबोट अतिशय कमी खर्चात तयार करण्यात आला आहे.
- अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आयटीआय विभागाने कोरोना रूग्णाच्या सेवेसाठी मदत करणारा स्वयंचलित रोबोट तयार केला सध्या हा रोबोट पटेल रूग्णालयाच्या कोरोना वॉर्डमध्ये कार्यरत आहे . सध्या विकसित केलेला चालता बोलता रोबोट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. नागरिकांचे स्क्रींनिंग, शरीराचे तापमान तपासणी तसेच इंग्रजी भाषेतून प्रश्न विचारणार आहे. त्यासाठी खास वेगळी यंत्रणा या रोबोटमध्ये बसविण्यात आली आहे. या रोबोटला कोरोनाच्या अनुषंगाने फिडिंग करण्यात आलेली प्रश्नावली बोर्डाच्या पटेल रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर गायकवाड यांनी तयार केली आहे.
-विजय चव्हाण, प्राचार्य, आय.टी.आय. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT