Role of Modi government to maintain power by keeping society unstable Adv Balasaheb Ambedkar Sakal
पुणे

समाज अस्थिर ठेवून सत्ता राखण्याची मोदी सरकारची भूमिका - ॲड. बाळासाहेब आंबेडकर

भारतीय जनता पक्षाने संविधान संपविण्याचे जाहीर केले आहे. जोपर्यंत समाज अस्थिर आहे तोपर्यंत कोणी हलवू शकत नाही, ही भूमिका मोदी सरकारची आहे.

------------ - कृष्णकांत कोबल

हडपसर : भारतीय जनता पक्षाने संविधान संपविण्याचे जाहीर केले आहे. जोपर्यंत समाज अस्थिर आहे तोपर्यंत कोणी हलवू शकत नाही, ही भूमिका मोदी सरकारची आहे. त्यामुळे मणिपूर सारख्या घटना घडत आहेत. त्यावर ते काही बोलत नाहीत. वंचित मुसलमानांना बरोबर घेऊन चांगला पर्याय पुढे आणत आहे.

म्हणून डॉ. अन्वर शेख यांना उमेदवारी दिली आहे. बीजेपीला हरविण्याची ही मोठी संधी आली आहे. मतदारांनी एक होऊन त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन वंचितचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारानिमित्त हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयाच्या प्रांगणात पक्षाचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार, मतदारसंघाचे अध्यक्ष विश्वास गदादे, कमलेश उकरंडे, विशाल गवळी, पितांबर धिवार, मौलाना हुसेन शेख, संभाजी गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, "शरद पवार बीजेपी बरोबर जाणार नाही, याची गॅरंटी आहे का, २०१४ ला भाजपला न मागता परस्पर साथ दिली. दोस्ती एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर हे त्यांचे धोरण आहे. पवारांमध्ये हिंमत नाही, भिती आहे.

त्यामुळे ते मोदींविरोधी बोलत नाहीत. आम्ही पवार व ठाकरे यांना पुढच्या पाच वर्षांसाठी भाजपबरोबर न जाण्याचे लिहून मागितले होते. मात्र, राजकारण असे चालत नाही, असे सांगत त्यांनी आम्हाला बरोबर घेणे टाळले. पुणे स्मार्ट सिटी करायला निघालेत. स्मार्ट तर बाजूलाच पण साधे पाणीही नीट पुरवूशकत नाहीत.

ना शहराला ना शेतीला पाणी. लोकसंख्येनुसार पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. नवीन शहरे विकसित केली तर पाणी नियोजन करता येईल. आपण काँग्रेस, राष्ट्रवादीवर विश्वास ठेवता. त्यातच आपल्याला फसवणारे बिल्डर आहेत.

झोपडपट्टीधारकांनी चांगल्या घराचे स्वप्न पाहताना सरकारने हे काम करण्याचा अग्रह धरला पाहिजे. सध्या ओबीसी मराठ्यांच्या बरोबर नाही आणि मराठा ओबीसींबरोबर नाही. बीजेपीला हरविण्यासाठी मुसलमान बनन्याची गरज आहे.

मोदी सरकार आपल्याच लोकांच्या विरोधात आहे. सतरा लाख नागरिक देश सोडून गेलेत. मानवतेचे मंदिर असलेल्या पंतप्रधान कार्यालयात वसुली सुरू आहे. उमेदवार डॉ. अन्वर शेख म्हणाले, "एक चांगला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीची तत्वे मला भावली. निवडणुकीत पक्षाची ताकद दिसून येईल.

तरूणांची संख्या देशात मोठी आहे. त्यांचे शिक्षण, कौशल्यविकास व रोजगार महत्वाचे आहेत. महिला, शेतकरी, कामगार यांचे देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका असूनही त्यांच्याकडे कोणत्याही सरकारने लक्ष दिले नाही. आपले प्रेशर कुकर हे चिन्ह निश्चितपणे इतरांची हवा काढून घेईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT