RPI Agitation
RPI Agitation Sakal
पुणे

शेतकरी, महिलांवरील अन्यायाच्या विरोधात रिपाइंची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीडित महिलांना अर्थसाहाय्य, ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ओबीसींना आरक्षण, अनुसूचित जाती-जमातीमधील पदोन्नतीतील अनुशेष भरावा यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले) वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभरात सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, ॲड. मंदार जोशी, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप, शैलेंद्र चव्हाण, बसवराज गायकवाड, बाबूराव घाडगे, महिपाल वाघमारे, प्रदीप कांबळे, नीलेश आल्हाट, जयदेव रंधवे, शशिकला वाघमारे, मीना गालटे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

ओल्या दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी. पीडित महिलांना ५० लाख रुपये मदत द्यावी. ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात यावे. महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून द्यावा. रेशनवरील निकृष्ट दर्जाच्या धान्याची चौकशी करण्यात यावी. अनुसूचित जाती-जमातीचा पदोन्नतीतील अनुशेष भरावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT