credit Card esakal
पुणे

क्रेडिट कार्ड बंद होणार सांगून, आजोबांची पावणे दोन लाखांची फसवणूक

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पांडुरंग सरोदे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : क्रेडीट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करीत अनोळखी व्यक्तीने वृद्ध नागरीकाच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेऊन वृद्धाची पावणे दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रवींद्रनाथ कुरलेक (वय 76, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हि घटना नोव्हेंबर 2020 मध्ये घडली आहे.

"नागरीकांनी प्रत्यक्षात, फोनवर किंवा सोशल मीडियाद्वारे भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवू नये. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे स्वतःचे बॅंक खाते किंवा अन्य गोपनीय माहिती देऊ नये. फसवणुकीच्या उद्देशाने कोणी संपर्क करत असेल, तर त्याबाबत कुटुंबीयांसह पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा.'' देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस ठाणे.

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

  • अनोळखी व्यक्तींना, फोनला प्रतिसाद देऊ नका

  • ऑनलाईन व्यवहार करताना कुटुंबीयांना कल्पना द्या

  • कोणालाही बॅंक खाते, डेबीट, क्रेडीट कार्डची माहिती किंवा ओटीपी क्रमांक देऊ नका

  • अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट, ईमेल, लिंकला प्रतिसाद देण्याचे टाळा

  • संपुर्ण माहिती असल्याशिवायक ई-बॅंकींग, ई-वॉलेटचा वापर करु नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT