National Cinema Day movie ticket at 75 rupees  esakal
पुणे

Pune News : आज 75, उद्या 100 रुपयात! पुणेकरांना स्वस्तात चित्रपट पाहण्याची संधी

'राष्ट्रीय चित्रपट दिना'निमित्त ही योजना असून आज दिवसभरात अनेक शो राहिले हाऊसफुल्ल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : 'राष्ट्रीय चित्रपट दिना'निमित्त आज (23 सप्टेंबर) पुण्यात 75 रुपयात सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून आज दिवसभरात अनेक शो राहिले हाऊसफुल्ल झाले आहेत, अशी माहिती सिटी प्राईडचे संचालक प्रकाश चाफळकर यांनी दिली. तसेच आज ज्यांना सिनेमा पाहता आला नाही त्यांच्यासाठी उद्या देखील सिनेमे पाहता येतील असंही त्यांनी जाहीर केलंय. (Rs 75 today Rs 100 tomorrow an opportunity for Pune residents to watch movies cheaply)

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 75 रुपयात सिनेमा या योजनेला पुण्यातील चित्रपटगृहात आज चांगला प्रतिसाद मिळाला. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (MAI) निर्णयानंतर आज चित्रपटगृहांमध्ये 75 रुपयांत चित्रपट पाहता येणार आहे, दिवसभरातील अनेक सिनेमांचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. पुण्यातील बहुतांश चित्रपटगृहातील सिनेमांचे शो हाऊसफुल झाल्याने थिएटर मालकांना दिलासा मिळाला आहे.

चाफळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,"आज दिवसभरातील सगळे शो हाऊसफुल आहेत. नागरिकांनी कालपासूनच अॅडव्हान्स बुकिंग केले होते. त्यामुळं आजपासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सिटी प्राईडमध्ये दिवसभरात आज ४० शो आहेत. पण या योजनेला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता आज ज्यांना चित्रपट पाहणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी उद्या सिटी प्राइड चित्रपट गृहात काही शो १०० रुपये तिकीट दराने उपलब्ध असतील"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का, मुरगुडमध्ये सत्ता समीकरण बदलले

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

SCROLL FOR NEXT