Madan Das Devi sakal
पुणे

Madan Das Devi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुशल संघटक आणि ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे आज सोमवारी पहाटे पाच वाजता बंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात निधन झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुशल संघटक आणि ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे आज सोमवारी पहाटे पाच वाजता बंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह होते.

त्यांचे पार्थिव आज दुपारी दीड ते चार या वेळेत 'केशव कृपा' (बंगळुरू) येथील संघटनेच्या प्रांत कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी, २५ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पुणे (महाराष्ट्र) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छात्र शक्तीचे राष्ट्रीय शक्तीमध्ये रूपांतर करणारे कुशल संघटक, प्रचारक

मदनदास देवी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील असून, त्यांनी शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी १९५९ मध्ये पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.कॉम.नंतर आयएलएस लॉ कॉलेजमधून गोल्ड मेडलसह एलएलबी केले. पुढे सीए केले.

पुण्यातील शिक्षणादरम्यान ते ज्येष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने संघाच्या संपर्कात आले. १९६४ पासून त्यांनी मुंबईत अभाविपचे कार्य सुरू केले. १९६६ मध्ये अभाविप मुंबईचे मंत्री झाले. १९६६ मध्ये आंतरराज्यीय विद्यार्थी जीवन दर्शनचे प्रतिनिधी ईशान्येकडे गेले आणि त्यांनी ईशान्येशी संपर्क सुरू केला.

१९६७ मध्ये अभाविपच्या इंदूर अधिवेशनापासून त्यांनी अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कामाला सुरवात केली. १९७० च्या तिरुवनंतपुरम अधिवेशनात राष्ट्रीय संघटन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonar Lake : अहो आर्श्चयम! लोणार सरोवरात आढळले चक्क मासे, दुर्मिळ जैवविविधता धोक्यात...

Pune: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा... पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तुळशीच्या लग्नानंतरच लग्नांचा शुभ मुहूर्त का सुरू होतो? जाणून घ्या कारण!

IND vs AUS, Viral Video: मैदानात शुभमन गिल बॅटिंग करत होता अन् कॅमेरा वळाला सारा तेंडुलकरकडे, पाहा कशी होती रिअॅक्शन

World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलं

SCROLL FOR NEXT