rte admission process pending due to otp
rte admission process pending due to otp 
पुणे

RTE प्रवेश प्रक्रिया रखडली; ओटीपने वाढला घोळ

सकाळवृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जात नवीन नोंदणी दरम्यान पालकांच्या मोबाईलवर ‘ओटीपी क्रमांक’ येतो. मात्र, सध्या हा ओटीपी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही ‘ओटीपी’ची तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत पालकांना अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे ही अडचण दूर झाल्याची सूचना आल्यानंतरच अर्ज भरण्यास सुरवात करावी, अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालनातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी पालकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव असणाऱ्या जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२१२२ मधील प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची सोय ३ मार्चपासून उपलब्ध झाली. आतापर्यंत राज्यातील एक लाख ३५ हजार ६८४ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेले आहेत. परंतु प्रवेश अर्ज भरण्यासाठी अवघ्या आठवडाभराची मुदत शिल्लक असतानाच, पालकांच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या चिंतेत असणाऱ्या पालकांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालकांना येत्या रविवारपर्यंत (ता. २१) ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील ९६ हजार ६५८ जागांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या दोन लाखांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑनलाइन अर्ज भरताना पालकांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘ओटीपी’ वेबपोर्टलद्वारे पाठविण्यात येतो. तो आल्यानंतरच त्याच्या साह्याने अर्ज भरण्याची पुढील प्रक्रिया खुली होते. मात्र, ओटीपी मिळण्यातील तांत्रिक अडचणींमुळे पालकांना गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी ‘पोर्टलवर ‘ओटीपी’ची तांत्रिक अडचण आलेली आहे. ती दूर करण्याचे काम सुरु आहे. तोपर्यंत पालकांनी अर्ज भरू नयेत. अडचण दूर झाल्याची सूचना पोर्टलवर दिली जाईल.’’ असा संदेश दिला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी आरटीई प्रवेशाच्या ‘https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex’ या पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.


राज्यातील स्थिती

शाळा : आरटीई २५ टक्के राखीव असलेल्या रिक्त जागा : आलेले अर्ज
९,४३२            ९६,६५८                                            १,३५,६८४
 

पुणेकरांनो, नाईट कर्फ्यूबाबत आलं अपडेट; पोलिस सहआयुक्तांनी काढले आदेश

जिल्हानिहाय आकडेवारी :
जिल्हा : शाळा : आरटीई २५ टक्के राखीव असलेल्या जागा : आलेले अर्ज
पुणे       ९८५                     १४,७७३                                              ३६,४७२
ठाणे      ६७७                     १२,०७४                                               ११,४५०
नागपूर   ६८०                       ५,७२९                                              १६,८८५
नाशिक  ४५०                       ४,५४४                                                ८,००९
नगर      ४०२                        ३,०१३                                                २,४३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT