शिक्रापूर (ता. शिरूर) ः आरटीओ सेवा केंद्राचे उद्‌घाटन करताना आमदार बाबूराव पाचर्णे. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी व मान्यवर.
शिक्रापूर (ता. शिरूर) ः आरटीओ सेवा केंद्राचे उद्‌घाटन करताना आमदार बाबूराव पाचर्णे. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी व मान्यवर. 
पुणे

आरटीओचे पहिले सेवा केंद्र शिक्रापुरात

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे): प्रादेशिक परिवहन विभाग व राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील पहिले आरटीओ सेवा केंद्र शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सुरू करण्यात आले आहे. शिरूर तालुक्‍यातील प्रत्येक पंचायत समिती गणात एक अशी चौदा आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक अशी चौदा आरटीओ सेवा केंद्र येत्या वर्षभरात सुरू करण्याची घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केली.

या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) सेवा या पुणे व निगडी कार्यालयातच मिळण्याची सुविधा होती. मात्र या सर्व सेवा ऑनलाइन करून त्या एकाच केंद्राद्वारे कार्यान्वित करण्याचा प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्य सरकार पातळीवर हाती घेण्यात आला होता. ही सेंटर्स नेमण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सीएससीचा (कॉमन सर्व्हीस सेंटर) पर्याय प्रादेशिक परिवहन विभागाला दिला. त्यानुसार राज्यातील पहिल्या आरटीओ सेवा केंद्राची सुरवात शिक्रापुरात झाली असून या केंद्राचे औपचारिक उद्‌घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते व प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दरम्यान आरटीओच्या सर्व कर, प्रमाणपत्र, मालकी, वाहन परवाना, फॅन्सी नंबर, वाहन विमा आदींसह सर्व सेवा या केंद्राद्वारे सरकारने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे दिल्या जाणार असल्याची माहिती आजरी यांनी दिली. शिक्रापूरचे केंद्र संचालक सुधीर मुळे यांचा सत्कार या वेळी वरील मान्यवरांनी केला. कार्यक्रमाला सरपंच जयश्री भुजबळ, सीएससीचे राज्य विभागप्रमुख वैभव देशपांडे, रुपम कुमार, विक्रम दलाल, नीलेश धांडे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, सुरेश थोरात आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चालक परवाना चाचणी
तालुका पातळीवर चालक परवाना देण्याची शिबिरे आरटीओकडून सुरू आहेत. मात्र ही शिबिरे आता जिल्ह्यात सुरू होणाऱ्या आरटीओ सेवा केंद्रांद्वारे सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. ती मिळताच चालक परवाना चाचणी या केंद्रांमधून होतील अशी माहिती बाबासाहेब आजरी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT