In RTO started by appointment only from Monday.jpg 
पुणे

पुणेकरांनो, आरटीओमध्ये जाणार आहात? मग अपॉइंटमेंट घ्या..कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे: कोरोनाच्या उद्रेकामुळे परिवहन कार्यालयात (आरटीओ) या पुढे काही कालावधीसाठी तरी नागरिकांना काही काम करायचे असल्यास त्यासाठी अपॉइनमेंट घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. सोमवारपासून (ता. 22) या पद्धतीची अंमलबजावणी होणार आहे.

- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

परिवहन आयुक्त कार्यालयाने आरटीओ कार्यालये सुरू करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यालयांत सोमवारपासून (ता. 22) नियमित कामकाज होणार आहे. त्यात 21 प्रकारची कामे होणार आहेत. त्यासाठी आरटीओने सुमारे 20 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱयांना कामावर उपस्थित राहण्याचा आ्देश दिला आहे. त्यातून रोज सुमारे 850 नागरिकांची कामे होतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.  

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

आरटीओमध्ये ही कामे प्राधान्याने होणार 
वाहनावरील कर्जाची नोंद कमी करणे, डुप्लिकेट आरसी देणे, ना हरकत प्रमाणपत्र देणे, वाहन नावापर सूचना देणे, वाहन नावावर करणे, प्रमाणित करणे, नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे, परराज्यातील वाहनांना नंबर देणे, आरसी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करणे, मोटर वाहनात बदल करणे, ना हरकत प्रमाणपत्र रद्द करणे, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल करणे, परिवन वर्गातून खासगी वाहनात नोंदणी करणे, वाहनावर कर्जाची नोंद करणे- नोंद कायम ठेवणे, वाहन हस्तांतरण करणे, कच्चे आणि पक्के लायसन देणे, योग्यता प्रमाणपत्र तपासणे 

- ...तरी चीनच्या अर्थव्यवस्थेवर काही फरक पडणार नाही; असं का म्हणाले चिदंबरम?

अपॉइनमेंट घेण्याची पद्धत 
आरटीआेमध्ये काही काम असल्यास नागरिकांना www.parivahan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. तेथे पुणे आरटीआे निवडून त्यावर कामाचा तपशील नमूद करायचा. तेथे कामाची नोंदणी झाल्यावर त्याचा क्रमांक नोंदवून घ्यायचा. आरटीआे कार्यालयात गेल्यावर तो क्रमांक सांगितल्यावर, संबंधित नागरिकाला हवे असलेले काम होणार आहे. अपॉइंटमेंट न घेता कोणत्याही प्रकारचे काम होणार नाही.

अशी घेणार काळजी 
- दोन अर्जदारांत किमान 6 फुटांचे अंतर हवे 
- एका अर्जदाराची चाचणी झाल्यावर संगणक, की-बोर्ड सॅनिटाईज करणार
- मास्क व हॅन्डग्लोव्हज वापरणाऱया नागरिकांनाच कार्यालयात प्रवेश दिला जाणार 
- कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार
- ज्या व्यक्तीचे काम आहे, त्यांनीच कार्यालयात यावे, सोबत शक्यतो कोणाला आणू नये

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT