RTPCR 
पुणे

RT-PCR चाचणीचा ‘कटऑफ’ निश्चित; कोरोना टेस्टनंतर जाणून घ्या आपली ‘CT व्हॅल्यू’

सम्राट कदम

पुणे : कोरोना विषाणूची बाधा झाली का नाही हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत केली जाणारी निदान चाचणी म्हणजे ‘रिव्हर्स ट्रान्सफॉर्म पॉलिमर चेन रिॲक्शन’ (आरटी-पीसीआर). आपली जर ही चाचणी झाली असेल तर त्यात ‘सीटी व्हॅल्यू’ किती आहे, हे निश्चित जाणून घ्या. कारण तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर उपचारासाठी याची मदत होणार आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) देशात या सीटीव्हॅल्यूसाठी ३५ चा ‘कटऑफ’ निश्चित केला आहे. जगभरामध्ये ‘सिटी व्हॅल्यू’साठी २४ ते ४० दरम्यान विविध ‘कटऑफ’ ठरविण्यात आला आहे. परंतु, आजवर यासाठी एक किंमत निश्चित करण्यात आली नव्हती. आयसीएमआरने देशासाठी ३५ ही किंमत निश्चित केल्यामुळे आरटीपीसीआर निदानातील अचूकता अधिक वाढणार आहे. सीटी व्हॅल्यूच्या ‘कटऑफ’ किमतीवर कोरोना पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे निश्चित केले जाते. म्हणजे त्या सिटी व्हॅल्यू पेक्षा कमी किंमत निघाल्यास कोरोना पॉझिटिव्ह, तर जास्त निघाल्यास निगेटिव्ह असे समजले जाते. जगभरातील शोधनिबंधांमध्ये २४ ते ४० दरम्यानच्या विविध किमती यासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. भारतात २४ कट ऑफ गृहित धरला जात होता. त्यामुळे व्हायरल लोड असलेले लक्षण न दिसणारे रूग्ण यातून सुटले जात होते. आता आयसीएमआरने यासंबंधी ३५ या अधिकृत ‘कट ऑफ’ची घोषणा केली आहे. 

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे सिटी व्हॅल्यू ? 
‘आरटीपीसीआर’ चाचणीमध्ये आरएनए स्वरूपात असलेल्या कोरोना विषाणूंच्यात वाढ करून डीएनए विकसित केला जातो. त्यानंतर या डीएनएच्या रेणूच्या आधारे कोरोनाचे निदान होते. विषाणूच्या आरएनएपासून हा रेणू विकसित करण्यासाठी किती प्रक्रियांच्या ‘चक्रां’चा अवलंब करावा लागला ती किंमत म्हणजे ‘सीटी व्हॅल्यू’. इंग्रजीत हिला ‘सायकल थ्रेशोल्ड’ म्हणून संबोधले जाते. 

उपचार होते मदत 
डॉक्टरांना जर कोरोना रुग्णाची सीटी व्हॅल्यू माहीत असेल तर त्याच्या उपचारासाठी मदत होते. रुग्णावर देखरेख किती ठेवायची, त्याला संभाव्य कोणत्या उपचारांची गरज असेल याचा अंदाज बांधता येतो. म्हणजे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज येवू शकते का, याची तयारीही है करते. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर एविडेंस बेस्ड मेडिसिन (सीईबीएम) चे संचालक प्रा. कार्ल आणि संशोधक विद्यार्थी टॉम जेफरसन यांच्या म्हणण्यानुसार सीटी व्हॅल्यू माहीत असल्यास उपचाराची पद्धत तर निश्चित करता येते. त्याचबरोबर संभाव्य मृत्यूदर कमी करण्यासाठीही याची मदत होते. 
- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशभरातील विविध प्रयोगशाळांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीटी व्हॅल्यू निश्चित करण्यात आली आहे. याआधी वापरात असलेल्या २४ च्या कट ऑफमुळे चुकीचे निदान होत होते. त्यामुळे संशोधनाच्या आधारे ३५ चा कट ऑफ निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे ३५च्या खाली सीटी व्हॅल्यू असलेले व्यक्ती कोरोना बाधित गृहीत धरली जाईल. 
- प्रा. बलराम भार्गव, महासंचालक, आयसीएमआर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT