lock down 
पुणे

हम नहीं सुधरेंगे...सोशल डिस्टन्सिंगचा असा उडतोय फज्जा 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर नगरपालिकेने शुक्रवारपासून (ता. 8) शहरातील हॉटेल, पानटपरी, सलून, ब्युटीपार्लर, मिठाई दुकाने, बार व परमीट रूम वगळता अन्य दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे शहरातील बाजारपेठेला आठवडे बाजाराचे स्वरूप आले होते. मात्र, नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत होते. त्यामुळे लॉकडाउन संपले की काय? असा प्रश्‍न गर्दी पाहून पडत होता. 

कोरोनाला रोखण्यासाठी तिसऱ्या लॉकडाउनची मुदत 17 मेपर्यंत असताना जुन्नर शहरातील जवळपास सर्वच दुकाने उघडली गेली. मात्र, अनेक दुकानांतून सामाजिक अंतर राखले जात नव्हते. काही नागरिक विना मास्कचे फिरताना आढळून येत होते. काही रुमाल व मास्क गळ्यात ठेवून फिरत होते. बाजारपेठेत पुरेसा पोलिस बंदोबस्त दिसत नव्हता. ग्राहकांसाठी सॅनिटायझरचा वापर काही मोजक्‍या दुकानातून केला जात होता. जीवनावश्‍यक वस्तूच्या दुकानांसह कापड दुकानदार, सोने- चांदीची दुकाने, पार्सल देणारी हॉटेल, गॅरेज, हार्डवेअर, भांडी आदी दुकाने सुरू करण्यात आली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यास परवानगी असली, तरी काही लहान व्यापारी आपली दुकाने एक वाजेपर्यंत सुरू ठेवतात, तर मोठे व्यापारी दिवसभर उघडी ठेवतात. नव्याने सुरू झालेल्या दुकानांच्या वेळेबाबत प्रशासनाकडून निश्‍चित वेळ देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी दुपारी दोन वाजता पोलिसांची गाडी फिरू लागल्यानंतर आपापली दुकाने बंद केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

SCROLL FOR NEXT