Rupali Chakankar congratulate archana Atram to became the first woman driver of ST in history  
पुणे

Video : एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेअरिंग महिलेच्या हाती! सासवड ते नीरा चालवली बस

रोहित कणसे

पुणे : राज्यातील सामन्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एसटीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासात आता पहिल्यांदा एका महिला ड्रायव्हरने बस चालविली आहे.

याचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. या ऐतिहासिक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

चाकणकर यांनी महिला चालकाचा एसटी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे अभिनंदन केलं आहे. "नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!"

अत्राम यांचा बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाह्यरल होत आहे. मात्र एसटी महामंडळाकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. आजवर एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करत आहेत.मात्र यानंतर आता महिला चालक देखील एसटी चालवताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

"आणि मी कारमधील गणपतीची ओरबाडून काढून फेकली" जुई गडकरीने सांगितला तो प्रसंग; "मी हॉस्पिटलमध्ये.."

SCROLL FOR NEXT