Modi_Rapali Patil
Modi_Rapali Patil 
पुणे

PM मोदींच्या आवाहनावर रुपाली पाटलांचं ट्विट; दिला फडणवीसांचा दाखला!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी घराणेशाहीवर सडकून टीका केली. तसेच घराणेशाहीचं राजकारण संपवण्याच्या लढ्यात आपल्याला साथ द्या, असं आवाहनही जनतेला केलं. मोदींच्या या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी फडणवीस कुटुंबाचा राजकीय प्रवासाचा दाखला दिला आहे.

घराणेशाही संपवणार आहात नरेंद्र मोदी साहेब. मग हे पाहा...गंगाधरराव फडणवीस (आमदार), शोभाताई फडणवीस (माजी मंत्री), देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) याचं काय? वाट पाहुयात आता... मोदी साहेबांना त्यांच्या पक्षातून आणि महाराष्ट्रातून सुरुवात कधी करताहेत याची, अशा आशयाचं ट्विट रुपाली पाटील यांनी केलं आहे. पतंप्रधानांच्या आवाहनाला मान देत फडणवीस राजीनामा देतील का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

मोदींनी लाल किल्ल्यावरुन केला हल्लाबोल

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आपल्या नवव्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं की, भारतापुढील सर्वात मोठी दोन आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहेत. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे. घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.

PM मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर

लोकशाहीत घराणेशाही कुणीही आणू शकत नाही. जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी? असा सवाल उपस्थित करत विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कारकिर्दीचा आठवण करुन दिली.

हे जे काही घराणेशाही घराणेशाही म्हटलं जात ज्यांच्यामध्ये कुवत नाही ताकद नाही कर्तृत्व नाही, अशांना जर बळजबरीने पदावर बसवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये घराणेशाही म्हणू शकता. परंतु एखाद्याच्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची पिढी कर्तुत्वान असेल तर आणि लोकशाही पद्धतीने त्यांना त्यांच्या भागातील जनतेने आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणण साफ चुकीचं आहे. अशा शब्दात मोदींच्या विधानावर अजित पवार यांनी पलटवार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT