Rupali Thombare Patil And Raj Thackeray  Sakal
पुणे

पुण्यात मनसेला धक्का, रुपाली पाटील ठोंबरेंचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

सुशांत जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणी अशी ओळख असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare ) यांनी अखेर मनसे सोडली आहे. यापूर्वीच त्यांनी एका मुलाखतीमध्ये पक्ष सोडण्याबाबतचे संकेत दिले होते. रुपाली पाटील ठोंबरे यांनी यासंदर्भात महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असा उल्लेख त्यांनी केला आहे.

आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहिल. यापुढेही आपले आशीर्वाद आणि राज साहेब ठाकरे हे नाव ह्रदयात कायम राहिल, अशा भावनिक शब्दांचा उल्लेख त्यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे (Pune) दौऱ्यावर येण्याआधीच रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्या लवकर नव्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात मनसेला मोठ खिंडार पडले आहे. पुढील दोन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. पक्षांतर्गत वादामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्या मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT